शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या महिला कार्याध्यक्षाचे मंगळसूत्र पळविले दोन संशयित अटकेत: वृद्धाचे दागिने लंपास

By admin | Updated: May 11, 2014 00:15 IST

राष्ट्रवादी काँग्रेस शहर महिला कार्याध्यक्षाच्या गळ्यातील तीन तोळ्याचे मंगळसूत्र मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी पळविल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली.

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस शहर महिला कार्याध्यक्षाच्या गळ्यातील तीन तोळ्याचे मंगळसूत्र मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी पळविल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. याप्रकरणी दोन संशयितांना विजापूर नाका पोलिसांनी अटक केली आहे.वैशाली गुंड (४१, रा. ब्लॉक नं. २२/२३ कोटणीसनगर, विजापूररोड) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विजय जीवन जोकारे (वय २५, रा. जयकुमारनगर,विजापूर रोड सोलापूर), संकेत शामसुंदर प्रतिनिधी (२३, रा. ८४ नरेंद्रनगर सैफुल) या दोघा संशयिताविरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुंड या मुलगी समृद्धीसह ९ मे रोजी रात्री सव्वादहा वाजता विजापूर महामार्गावरून कोटणीसनगरच्या वळणावर पनाश अपार्टमेंटच्यासमोरुन स्कुटरवरून घराकडे निघाल्या होत्या. वळणावर पाठीमागून मोटरसायकलवरून आलेल्या दोन चोरट्यांपैकी पाठीमागे बसलेल्याने अचानकपणे गळ्यात हात घालून गंठण हिसकावले.अचानक घडलेल्या या प्रकाराने त्या सावध झाल्या. त्यांनी आरडाओरडा केला पण चोरटे पसार झाले. घटनेनंतर त्यांनी लगेच पोलिसांना माहिती दिली. पण पोलीस हलले नाहीत. ना त्यांच्या मदतीला महिला पथक आले ना स्थानिक पोलीस. घटनेबाबत फिर्याद देण्यासाठी त्या पोलीस ठाण्यात गेल्या. फिर्याद दाखल करण्यासाठी त्यांना मध्यरात्रीचे एक वाजले. गुंड यांनी केलेल्या वर्णनावरून मध्यरात्री एकच्या सुमाराला दोन संशयितांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयितांची चौकशी करून त्यांना अटक केली आहे.तपास फौजदार अमर पाटील करीत आहेत.