शहरं
Join us  
Trending Stories
1
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
2
संपादकीय: ...आता थेट मुकाबला ! आनंदाचा शिधा देणार नसले, तरी... 
3
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
4
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
5
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
6
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
7
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
8
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
9
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
10
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
11
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
12
अमेरिकन गरुड, चिनी ड्रॅगन आणि भारतीय हत्ती!
13
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
14
चंद्रभ्रमंती करून ‘स्पेस फ्लाइट’ने घरी परत याल, तेव्हा...
15
तरुणाई ठरवणार बिहारचा मुख्यमंत्री?
16
विशेष न्यायालयाचा दोघांची सुटका करण्यास नकार; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, सरकारी वकिलांची माहिती  
17
अपहरण केले, पण चांगले खायला दिले; दिलीप खेडकरचा असाही बचावात्मक पवित्रा
18
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
19
पालकांचा सांभाळ मुलांनी केलाच पाहिजे; बक्षिसपत्राविषयी उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
20
अतिवृष्टीचे निकष बदलून शेतकऱ्यांना करणार मदत; बुजलेल्या विहिरींनाही मदतीचा प्रस्ताव

पुण्यात प्रेमसंबंधातून दोघांची आत्महत्या

By admin | Updated: May 7, 2017 03:03 IST

दिघी, आदर्शनगर येथे विवाहितेसह तिच्या ओळखीतील एकाने हाताच्या नसा कापून तसेच शरीरावर चाकूचे वार करून जीवनयात्रा

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी (पुणे) : दिघी, आदर्शनगर येथे विवाहितेसह तिच्या ओळखीतील एकाने हाताच्या नसा कापून तसेच शरीरावर चाकूचे वार करून जीवनयात्रा संपवली. ही घटना दुपारी दीडच्या सुमारास घडली. सपना सुरेश भले (२५, मूळ गाव हडसर, ता. जुन्नर, सध्या रा. दिघी) असे विवाहितेचे नाव आहे. तर पद्माकर साबळे (२४, मूळगाव हडसर, जुन्नर) असे तरुणाचे नाव आहे. प्रेमसंबंधातून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सपना दिघी येथे दोन वर्षांपासून पतीसोबत राहाण्यास आली होती. तिला साडेचार वर्षाची मुलगी आहे. पती भोसरी एमआयडीसीतील कंपनीत कंत्राटी पद्धतीने काम करतो. नेहमीप्रमाणे पती कामावर गेलेला असताना, ती घरी एकटीच होती. गावाकडील पूर्वीची ओळख असलेला पद्माकर साबळे तिच्या घरी आला. त्यांच्यात वाद झाला. सपनाचा भाऊ याच परिसरात राहातो. सपनाच्या घरात आरडाओरडा सुरू असल्याचे त्याला समजले. तो सपनाच्या घरी आला. दरवाजा वाजवला, त्या वेळी सपनाने दरवाजा उघडला, परंतु ती रक्ताने माखलेली होती. काही क्षणातच ती खाली कोसळली. बाजूला पद्माकर रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. सपनाच्या भावाने तिच्या पतीला फोनवरून माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सपना व पद्माकर यांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात आणले. परंतु पद्माकरचा अगोदरच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर सपनाचा रुग्णालयात नेल्यानंतर मृत्यू झाला. दोघांच्या शरीरावर हत्याराने वार केल्याच्या जखमा होत्या. घरातील चाकूने हाताच्या शिरा कापल्याचे निदर्शनास आले. पद्माकरच्या पोटावरही चाकूचे वार होते. दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण रुग्णालयात नेण्यात आले. ते होते एकाच गावचे रहिवासी सपना भले व पद्माकर साबळे हे जुन्नर येथील एकाच गावचे रहिवासी होते. साबळे आणि सपनाची पूर्वीपासून ओळख असल्याने त्यांची अधूनमधून भेट होत असे. सपनाच्या पतीबरोबरही त्याची ओळख होती. सपनाचा भाऊसुद्धा त्याला ओळखत असे. पद्माकरसुद्धा काही महिन्यांपासून पुण्यातच राहण्यास आला होता. सपनाचा विवाह झाल्यानंतरही पद्माकर तिला भेटण्यास येत असे. यावरून त्यांच्यात खटके उडत होते. यामुळेच दोघांनी जीवनयात्रा संपविली असावी, अशी चर्चा आहे.