सोलापूर : दोन पोलीस अधिकाऱ्यांच्या पत्नींनी सोमवारी एकाच दिवशी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई लोहमार्ग पोलीस दलात कार्यरत असलेले विनोद बंगाळे यांच्या पत्नी चारुशीला बंगाळे ( ३२) आणि सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील शिवप्पा बिराजदार यांच्या पत्नी विजयालक्ष्मी बिराजदार (२२) अशी या दोघींची नावे आहेत. या आत्महत्यांमागचे कारण अद्याप समजलेले नाही. दोघींचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. या प्रकरणाचा शहर पोलीस तपास करीत आहेत. एकाच दिवशी दोन पोलीस पत्नींनी आत्महत्या केल्याने पोलीस वसाहतीमधील वातावरण शोकाकुल झाले. (प्रतिनिधी)कविता नगर पोलीस वसाहतीत विजयालक्ष्मी यांनी गळफास घेतला तर मुख्यालयातील पोलीस वसाहतीच्या मागे चारुशीला बंगाळे यांचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आला.
सोलापुरात २ पोलीस पत्नींची आत्महत्या
By admin | Updated: May 2, 2017 05:32 IST