अश्विनी मघाडे, औरंगाबादडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अभियांत्रिकी परीक्षेच्या उत्तरपत्रिका तपासणीचा गैरकारभार ‘लोकमत’ ने उघडकीस आणताच शिक्षण क्षेत्र ढवळून निघाले. विद्यापीठाने या वृत्ताची गंभीर दखल घेऊन ‘पीईएस’ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे दोन प्राध्यापकांना तडकाफडकी निलंबित केले, तर या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत.औरंगाबादेतील ‘पीईएस’ अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरू असलेल्या उत्तरपत्रिका तपासणीचा गैरकारभार ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनद्वारा चव्हाट्यावर आणताच विद्यापीठ प्रशासन खडबडून जागे झाले. परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण यांनी आज सकाळीच ‘पीईएस’ महाविद्यालयास भेट देऊन पेपर तपासणी केंद्राची पाहणी करून पेपर तपासणीतील गैरकारभाराबद्दल प्राचार्यांना जाब विचारला. विद्यापीठाने महाविद्यालयाला कारणे दाखवा नोटिसही बजावली आहे.
‘पीईएस’चे दोन प्राध्यापक निलंबित
By admin | Updated: July 16, 2014 02:48 IST