पिंजर (जि. अकोला) : पिंजर पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील टाकळी पोटे येथील शिवारात गुरे चारण्यास गेलेल्या दोन गुराख्यांवर वीज कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना २६ जून रोजी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. टाकळी पोटे येथील अंबादास चंपत इंगळे व अशोक जगदेव ढवळे हे गुराखी सकाळी गुरे घेऊन गावशिवारातील रानात गेले होते. सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास आकाश ढगांनी भरून येऊन विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. यावेळी गुरे घेऊन परतीच्या तयारीत असलेल्या अंबादास इंगळे व अशोक ढवळे यांच्यावर वीज पडून दोघेही जागीच ठार झाले. सायंकाळी ७ वाजेपर्यंत घरी दोघे न परतल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी शोध घेतला असता, वीज पडून त्यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. घटनास्थळी पोलीस पोहचले पुढील कारवाई सुरु आहे.
वीज पडून दोघे ठार
By admin | Updated: June 27, 2016 02:42 IST