शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

म्हैसाळ भ्रूण हत्याकांडातील आणखी दोन एजंटांना अटक

By admin | Updated: March 13, 2017 11:13 IST

भ्रूण हत्याकांडप्रकरणी डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्या आणखी दोन एजंटांना पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा अटक केली

ऑनलाइन लोकमतसांगली, दि. 13 - संपूर्ण राज्यभर गाजत असलेल्या म्हैसाळ (ता. मिरज) येथील भ्रूण हत्याकांडप्रकरणी डॉ. बाबासाहेब खिद्रापुरे याच्या आणखी दोन एजंटांना पोलिसांनी रविवारी रात्री उशिरा अटक केली. संदीप विलास जाधव (वय ३२, रा. शिरढोण, ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) आणि वीरगोंडा ऊर्फ बंडू रावसाहेब गोमटे (३९, कागवाड, ता. अथणी, जि. बेळगाव) अशी त्यांची नावे आहेत. या प्रकरणात आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.म्हैसाळ येथील डॉ. खिद्रापुरे याच्या रुग्णालयात मणेराजुरी (ता. तासगाव) येथील स्वाती जमदाडे या विवाहितेचा अनैसर्गिक गर्भपात करताना मृत्यू झाला होता. त्यानंतर म्हैसाळ परिसरात पुरलेले १९ रुग्ण सापडले होते. भ्रूण हत्याकांडाचे हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यभर खळबळ उडाली.या प्रकरणातील खिद्रापुरेसह दोन डॉक्टर, परिचारिका, औषध पुरवठादार, दोन एजंट असे सात जण पोलीस कोठडीत आहेत. रविवारी रात्री जाधव आणि गोमटे या आणखी दोघा एजंटांना पोलिसांनी शिरढोण आणि कागवाड येथून अटक केली. त्यांनीही डॉ. खिद्रापुरेकडे गर्भपातासाठी रुग्ण आणल्याची कबुली दिली आहे.(म्हैसाळ भ्रूणहत्याकांड; चौकशी अधिकारी बदलला)शिवाय कर्नाटकातील शेडबाळ येथील एका महिला डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. खिद्रापुरे याच्या रुग्णालयात सांगली, मिरजेतील काही डॉक्टरांनी रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. या गैरकृत्यात सहभागी असलेल्यांपैकी कागवाड येथील डॉ. श्रीहरी घोडके हा रुग्णांची गर्भलिंग चाचणी करून शेडबाळ येथील महिला डॉक्टरकडे गर्भपात करीत असल्याचे समोर आल्याने संबंधित महिला डॉक्टरला ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. खिद्रापुरे याची पत्नी डॉ. मनीषा हिच्या चौकशीतून सांगली, मिरजेतील काही डॉक्टर शस्त्रक्रियेसाठी म्हैसाळला येत असल्याची माहिती मिळाली आहे. अटकेतील आरोपींच्या चौकशीत कर्नाटकात गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरांकडून महिलांची तपासणी करून खिद्रापुरे हा गेली आठ वर्षे भ्रूूणहत्या करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.