शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

...तर दोन महिन्यांनी आयुक्तांना पुन्हा मारायला येऊ: बच्चू कडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 19:14 IST

महानगरपालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्यावर हात उगारून शाब्दिक वाद घातल्याप्रकरणी अचलपूर विधानसभा मतदार संघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांना पोलिसांनी अटक करून जिल्हा न्यायालयात हजर

ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. 24 - महानगरपालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांच्यावर हात उगारून शाब्दिक वाद घातल्याप्रकरणी अचलपूर विधानसभा मतदार संघाचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांना पोलिसांनी अटक करून जिल्हा न्यायालयात हजर केले होते. जिल्हा व सत्र न्यायालायाने कडू यांना जामीन मंजूर केला आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांनी त्यांना अटक केली होती. नाशिकच्या मनपा आयुक्तांवर हात उगारल्याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आला आहे. 
 
यावेळी लोकमतसोबत बोलताना, "आज मारले नाही तरी मारल्याची फिर्याद दिली . आता अपंग बांधवाना न्याय दिला नाही तर दोन महिन्यांनी अभिषेक कृष्ण यांना पुन्हा मारायला येऊ असा इशारा आमदार कडू यांनी दिला.   
 
नाशिक महापालिकेने 1995चा अपंग पुनर्वसन कायदा अद्याप अंमलात आणला नाही. तसेच अपंगांचा राखीव तीन टक्के निधी आजपर्यंत खर्च केला जात नसल्यामुळे मनपा मुख्यालयासमोर दुपारी बारा वाजेपासून धरणे आंदोलन सुरू आहे. प्रहार संघटनेच्या नेतृत्त्वाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे आमदार बच्चू कडू यांनी शिष्टमंडळासमवेत महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या शाब्दिक वादानंतर कडू यांचा संयम सुटला आणि त्यांनी थेट कृष्ण यांच्यावर हात उगारला. शिष्टमंडळाच्या कार्यकर्त्यांनी कडू यांना रोखले अन्यथा अनर्थ झाला असता. नाशिकच्या मनपा आयुक्तांवर हात उगारल्याप्रकरणी सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आला आहे.  शाब्दिक वादानंतर नाशिकच्या महापालिका आयुक्तांवर त्यांनी हात उगारला होता.