शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
2
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
3
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
4
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात 4 माओवाद्यांचा खात्मा
5
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
6
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
7
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
8
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
9
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
10
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
11
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
12
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
13
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
14
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
15
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
16
एका वर्षात 'ग्रॅच्युइटी' मिळण्याचा नियम कागदावरच; नव्या लेबर कोडची प्रतीक्षा लांबली! का होतोय उशीर?
17
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
18
नांदेडमध्ये काळजाचा थरकाप! आई-वडील घरात मृतावस्थेत, तर मुलांनी रेल्वेखाली संपवलं आयुष्य
19
संतापजनक घटना! नातीनं विरोधात जाऊन लग्न केलं, संतापलेल्या आजीने नातीच्या ४० दिवसांच्या बाळाला संपवलं
20
जिथे कोंडी केली, तेच ठिकाण ‘गेम चेंजर’ ठरणार; ठाकूरांना खिंडीत गाठण्यासाठी भाजपाची रणनीती!
Daily Top 2Weekly Top 5

दोन सावकारांना अटक

By admin | Updated: December 30, 2015 00:57 IST

बनेवाडी प्रकरण : निवृत्त पोलिसाचा समावेश; आणखी दोघांची नावे निष्पन्न

इस्लामपूर : बनेवाडी (ता. वाळवा) येथील एकाच कुटुंबातील चौघांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी दोन सावकारांना मंगळवारी सायंकाळी अटक केली. त्यात एक निवृत्त पोलिसाचा समावेश आहे. याबाबत चौघा सावकारांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करणे, यासह सावकारी गुन्ह्यांची नोंद मंगळवारी पहाटे तीन वाजता करण्यात आली. अटक केलेल्यांमध्ये मोहन केशव पाटील (वय ४२, रा. ताकारी, ता. वाळवा) व निवृत्त पोलीस जयवंत विष्णू पाटणकर (५२, रा. बोरगाव) यांचा समावेश आहे. श्रीकांत चमणराव जाधव, विकास कुमार पाटील (दोघे रा. ताकारी) हे संशयित फरारी आहेत. त्यांच्या अटकेसाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. याप्रकरणी मृत संजय यादव यांचे मेहुणे संजय महादेव खोत (रा. पडवळवाडी, ता. वाळवा) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. सावकारांच्या जाचाला कंटाळून सोमवारी पहाटे संजय भीमराव यादव (५०, रा. बनेवाडी) यांच्यासह त्यांची पत्नी जयश्री यादव (३०) यांनी आत्महत्या केली होती. तत्पूर्वी, मुलगा राजवर्धन (४ वर्षे) आणि मुलगी समृद्धी (४ महिने) यांना यादव दाम्पत्याने गळा आवळून ठार मारले होते. जयश्री व संजय यांचा २०१० मध्ये विवाह झाला होता. तीन वर्षांपूर्वी आईचे आजारपण, पत्नीचे बाळंतपण व बेकरी व्यवसायामुळे त्यांची आर्थिक ओढाताण झाली होती. त्यामुळे संजय यादव यांनी सावकारांकडून वेळोवेळी सात ते आठ लाख रुपयांचे मासिक दहा टक्केव्याजाने कर्ज घेतले होते. दोन वर्षांपूर्वी यादव यांनी पत्नीचे गंठण गहाण ठेवून व्याजापोटी सावकारांना ५० हजार रुपये दिले होते. त्यावेळी विकास पाटील यांचे तीन लाख रुपयांचे व्याज देऊनही तो पाच लाखांची मागणी करीत होता. श्रीकांत जाधव एक लाख रुपये व्याजासह मागत होता, तर जयवंत पाटणकर २० हजारांसाठी, मोहन केशव पाटील ३० हजार रुपयांसाठी तिप्पट रकमेची मागणी व्याजासह करीत होते.या दरम्यान मेहुणे संजय खोत यांनी यादव यांना एक लाख रुपये व म्हैस दिली होती. त्यावेळीही यादव यांनी सावकारांचे व्याज भागविले होते. मात्र, तरीही पाटणकर हा म्हैस घेऊन जाण्याची धमकी देत होता. ही माहिती यादव यांनी २५ डिसेंबरला मेहुणे संजय यांना दिली होती. जयश्री यांनीही दूरध्वनीवरून ‘चौघे सावकार पैशांचा तगादा लावत आहेत, त्यामुळे पैशांची काहीतरी तरतूद कर, नाहीतर पती आम्हाला घरातून हाकलून देतील’, असे मेहुण्याला सांगितले होते. २७ डिसेंबरला संजय यादव मुलगा राजवर्धनला घेऊन पडवळवाडीला गेले होते.त्यावेळीही त्यांनी ‘पाटणकर हा ६५ हजार रुपये मागतोय, त्यासाठी थोडे पैसे द्या’, अशी विनंती मेहुण्याला केली होती. त्यांनी म्हैस विकून येतील ते पैसे द्या, असा सल्ला दिला. त्यानंतर संजय यादव यांनी संपूर्ण कुटुंब संपविण्याचा निर्णय घेतला, असा पोलिसांचा अंदाज आहे. (वार्ताहर)चिठ्ठीतील मजकूर उघडसावकार श्रीकांत जाधव, विकास पाटील (ताकारी) यांनी नोटरी करून धनादेश घेतले आहेत. पाटणकर आप्पा (बोरगाव) याने चार धनादेश घेतले आहेत, तर मोहन आबाने दोन धनादेश घेतले आहेत. या सर्वांच्या त्रासाला कंटाळून सर्व कुटुंब आत्महत्या करीत आहे. घेतलेल्या रकमेला सावकारांकडून प्रत्येक दिवसाला पाच हजार रुपये दंड लावला जात होता. कोरे धनादेश घेऊन पैसे दिले नाहीस, तर गावातून हाकलून देण्याची धमकी देत होते, असे संजय यादव यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे.