शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
3
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
4
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
5
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
6
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
7
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
8
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
9
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
10
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
11
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
12
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
13
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
14
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
15
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
16
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
17
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
18
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
19
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
20
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...

ट्रॅव्हल्स-दुचाकी अपघातात दोन ठार

By admin | Updated: May 12, 2014 00:07 IST

संतप्त जमावाकडून ट्रॅव्हल्सची तोडफोड

चिखली : भावाच्या लग्नपत्रिका वाटून चिखली येथून देऊळगावराजाकडे दुचाकीने निघालेल्या दोन युवकांना खासगी कंपनीच्या ट्रॅव्हल्सने समोरून दिलेल्या जबर धडकेत एक जण जागीच ठार, तर एकास गंभीर अवस्थेत औरंगाबादकडे उपचारार्थ नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना ११ मे रोजी शहरापासून जवळच असलेल्या भानखेड फाट्याजवळ सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. याबाबत सविस्तर असे, की जाफ्राबाद तालुक्यातील वरूड येथील रहिवासी अनंथा साळुबा काळे (२९) याच्या भावाचे १५ मे रोजी लग्न असल्याने तो त्याचा चुलत भाऊ योगेश अंबादास काळे याच्यासह चिखली शहरातील आपल्या नातेवाइकांकडे लग्नपत्रिका वाटण्यासाठी एम.एच.२८ यू ६७७४ क्रमांकाच्या दुचाकीने आला होता. लग्नपत्रिका वाटून झाल्यानंतर चिखलीवरून देऊळगावराजाकडे जात असताना शहरापासून जवळच असलेल्या भानखेड फाट्यानजीक विरुद्ध दिशेने येणार्‍या चिंतामणी ट्रॅव्हल्स क्रमांक एम.एच.२९ टी.७२७३ मुंबई-बुलडाणा या गाडीचे अँक्सल तुटल्याने गाडी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले व समोरून येणार्‍या दुचाकीस ट्रॅव्हल्सने जबर धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीवरील अनंथा काळे याचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर योगेश काळे यास गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी औरंगाबादकडे नेत असताना रस्त्यातच त्याची प्राणज्योत मालवली. अपघातानंतर रस्त्यावरची वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहतूक शाखेचे पीएसआय भोई, नेमणार, पाटील, बनसोडे, नागरे, लोंढे यांनी तातडीने उपाययोजना करून वाहतूक सुरळीत केली. अपघाताची माहिती कळताच घटनास्थळी दाखल झालेल्या मनसेचे प्रदीप भवर, पंकज सुरडकर, दत्ता सुरडकर यांनी अपघातातील जखमी व मृतकाला ग्रामीण रुग्णालयात हलविण्यासाठी मदत केली. याप्रकरणी सखराम संपत शेळके रा. वरुड, ता. जाफ्राबाद यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिखली पोलिसांनी कलम २७९, ३३७, ३३८, ३0४ (अ) भादंविनुसार गुन्हा दाखल केला असून, अपघातास कारणीभूत ट्रॅव्हल्स चालकाला अटक केली आहे. चौपदरीकरणाच्या दुष्टचक्रात अडकलेला व मृत्यूचा सापळा बनलेल्या जालना-खामगाव महामार्गाने अपघाताच्या घटनेत दिवसेंदिवस वाढच होत आहे. या महामार्गाने चौपदरीकरणाचे काम गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित आहे. यामुळे मार्गावर जगोजागी खड्डे आणि बांधकामे साहित्य पडून असल्यामुळे वाहनचालकांना प्रवास करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे आज या महामार्गाने आणखी दोन बळी घेतले. ** संतप्त जमावाची गाडीवर दगडफेक गत अनेक वर्षांपासून रखडलेल्या जालना-खामगाव रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामामुळे या रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली असून, अपघातांची मालिका सुरूच आहे. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष असून, अशातच रस्त्याच्या या दुरवस्थेमुळे आणखी दोन निष्पाप जीवांना आपला जीव गमवावा लागल्याचे वृत्त कळताच परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेतली. घटनास्थळी जमा झालेल्या संतप्त जमावाने आपला रोष व्यक्त करीत गाडीवर दगडफेक केली व काचा फोडल्या, तर काहींनी गाडी पेटवून देण्याचा प्रयत्न केला; मात्र वेळीच पोहचलेल्या पोलिसांनी जमावाला शांततेचे आवाहन करून पुढील परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.