शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
2
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
4
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
5
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
7
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
8
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
9
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
10
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
11
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
12
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
13
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
14
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
15
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
16
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
17
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
18
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
19
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
20
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश

वाळू माफियाकडून दोन तलाठ्यांचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2017 03:04 IST

जप्त केलेले वाळूचे टिप्पर राजूर येथून तहसीलमध्ये घेऊन जाणा-या दोन तलाठ्यांचे वाळू माफियाने अपहरण केल्याची घटना भोकरदन तालुक्यात घडली.

भोकरदन (जि. जालना) : जप्त केलेले वाळूचे टिप्पर राजूर येथून तहसीलमध्ये घेऊन जाणा-या दोन तलाठ्यांचे वाळू माफियाने अपहरण केल्याची घटना भोकरदन तालुक्यात घडली. रविवारी सकाळी आठच्या सुमारास बरंजळा ठोंबरे ते जवखेडा ठोंबरे दरम्यान पंधरा किलोमीटर हा थरार सुरू होता. पोलीस व महसूल पथकाने ग्रामस्थांच्या मदतीने ट्रक अडवून तलाठ्यांची सुटका केली.तहसीलदार संगीता कोल्हे यांच्या पथकाने सकाळी सातच्या सुमारास राजूर चौफुलीवर एका टिप्परला तीन ब्रास अवैध वाळूची वाहतूक करताना पकडले. चालकाने माहिती देण्यास टाळाटाळ केली. तहसीलदारांच्या सूचनेवरून चालक संतोष शिंदेला घेऊन तलाठी भागवत जाधव व रामेश्वर कांबळे हे टिप्परला घेऊन भोकरदन तहसीलकडे निघाले. काही अंतरावर एका जीपने टिप्परचा रस्ता अडवला व त्यामधून आलेल्या सर्जेराव नामेदव चव्हाण याने चालकाला खाली उतरवत टिपरचा ताबा घेतला. भरधाव टिप्परला बरंजळा रोडवर नेले.तहसीलदारांचे पथक टिप्परचा पाठलाग करीत होते. कोल्हे यांनी फोनवरून या प्रकाराची माहिती हसनबाद पोलिसांना दिली. पोलीस व महसूल पथकाने टिप्परचा पंधरा किलोमीटर पाठलाग केला. यादरम्यान चव्हाणने दोन्ही तलाठ्यांना टिप्परमधून खाली ढकलण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पाहून ग्रामस्थांनी रस्त्यावर दगड टाकल्याने टिप्पर पुढे जाऊ शकला नाही.