शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

दोन समलिंगी तरुणींचा आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Updated: September 1, 2016 04:07 IST

समलिंगी संबंधाला कुटुंबीयांकडून विरोध असल्याने एकाच परिसरात राहणाऱ्या दोन तरुणींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी चेंबूरमध्ये घडली.

मुंबई : समलिंगी संबंधाला कुटुंबीयांकडून विरोध असल्याने एकाच परिसरात राहणाऱ्या दोन तरुणींनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी चेंबूरमध्ये घडली. निशा (२१) आणि आशा (२१) (नाव बदललेले) अशी त्यांची नावे असून, यातील एका तरुणीचा मृत्यू झाला. या प्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी गुन्हा दाखल करत येथील शिवसेनेच्या शाखाप्रमुखासह दोघांना अटक केली.चेंबूरच्या लाल डोंगर परिसरात या दोघींचे कुटुंब वास्तव्य करत आहे. मागील अनेक वर्षांपासून या दोघींची मैत्री आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या दोघींमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. ही बाब निशाच्या कुटुंबीयांना रहिवाशांनी सांगितली. २७ आॅगस्टला या दोघी मरिन ड्राइव्ह येथे फिरण्यासाठी गेल्या होत्या. त्या रात्री घरी परतल्यानंतर कुटुंबीयांनी याबाबत जाब विचारल्यावर निशाने घरातील कीटकनाशक द्रव्याद्वारे आत्महत्येचा प्रयत्न केला. तिच्या वडिलांनी तिला रुग्णालयात दाखल केले. या घटनेनंतर त्यांनी आशाच्या मोठ्या बहिणीला फोन करून घरी बोलावले. या वेळी आशाही बहिणीसोबत तेथे गेली होती. येथे हजर स्थानिक शिवसेना शाखाप्रमुखासह निशाच्या वडिलांनी आशाला शिवीगाळ केली. यावर रागाने घरी आलेल्या आशाने रविवारी पोटमाळ्यावर दोरीने गळफास घेतला. तिच्या कुटुंबीयांना ही बाब समजताच त्यांनी चुनाभट्टी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनास राजावाडी रुग्णालयात पाठवला. तर आशाच्या बहिणीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी निशाचे वडील आणि शाखाप्रमुखाला अटक केली आहे. (प्रतिनिधी)