शहरं
Join us  
Trending Stories
1
डॉक्टर महिलेच्या हातावरील हस्ताक्षर तिचे नाही, बहिणीने सांगितले...; धनंजय मुंडेंच्या दाव्याने खळबळ
2
तिकडे ट्रम्प टॅरिफ-टॅरिफ करत बसले, इकडे भारताने मोठा धक्का दिला; चीनच्या सोबतीने तगडा फायदा झाला!
3
भारताच्या 'या' राज्यांवर बांगलादेशची नजर; युनूस यांनी पाकिस्तानला सोपवला वादग्रस्त नकाशा
4
मर्डर मिस्ट्री! क्राइम सीरीज पाहून तरुणीने घेतला लिव्ह इन पार्टनरचा जीव, 'असं' उलगडलं गूढ
5
CJI गवईंनी शिफारस केलेले न्या. सूर्यकांत कोण? ४० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव; कधीपर्यंत असणार CJI?
6
प्रमोद महाजन यांची हत्या का झाली?  १९ वर्षांनंतर भाऊ प्रकाश महाजन यांचा धक्कादायक गौप्यस्फोट, म्हणाले...
7
Phaltan Doctor Death: "डॉक्टर तरुणीवर माझ्या मुलीचा पोस्टमार्टम रिपोर्ट बदलण्यासाठी दबाव टाकला", दीपाली निंबाळकर प्रकरणाने वेगळं वळण
8
Viral Video: विरुद्ध दिशेनं येणाऱ्या ट्रकचालकाचं नियंत्रण सुटलं अन्...; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडीओ!
9
AGR प्रकरणी Vodafone Idea ला सर्वोच्च न्यायालयाकडून मिळाली संजीवनी; शेअर्समध्ये जबरदस्त वाढ
10
श्रेयस अय्यर सिडनीच्या रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचाराला सुरुवात, कॅच घेताना झालेली दुखापत
11
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
12
विजय देवरकोंडा पोहोचला कोकणात, आगामी सिनेमाच्या शूटिंगसाठी 'या' गावात उभारला सेट
13
VIDEO: अनाया बांगर पुन्हा जुन्या दिवसांकडे परतणार, सर्जरीनंतर ३ महिन्यांत घेतला मोठा निर्णय
14
Lenskartच्या आयपीओची ग्रे मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री; प्राईज बँड ते लिस्टिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
15
DP वर कलेक्टरचा फोटो, IAS च्या नावाने अधिकाऱ्यांकडे मागितले पैसे; पोलिसांनी केलं अलर्ट
16
Digital Arrest: 'डिजिटल अरेस्ट' फसवणूक करणाऱ्यांची आता खैर नाही; सुप्रीम कोर्टानं उचललं मोठं पाऊल!
17
वैभव खेडेकरांना मोठा धक्का; भाजपात गेलेले अनेक पदाधिकारी महिनाभरातच मनसेत परतले, गड राखणार?
18
तुमचा आजचा मासिक खर्च ३०,००० रुपये असेल, तर निवृत्तीनंतर ही जीवनशैली जगायला किती पैसे लागतील?
19
पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये जमा करा ₹५०००; मॅच्युरिटीवर मिळेल १६ लाखांपेक्षा अधिक रक्कम, जाणून घ्या

घरफोड्या करणाऱ्या दोन टोळया जेरबंद: ५५ लाखांचा ऐवज हस्तगत

By admin | Updated: January 4, 2017 20:33 IST

मुंबई आणि ठाणे परिसरात घरफोड्या करणाऱ्या टक्कुसिंग टाक (शिकलकर, रा. नारंगीफाटा, विरार, पालघर) याच्यासह शिकलकर टोळीतील पाच तसेच चार सराफ

जितेंद्र कालेकर/ ऑनलाइन लोकमतठाणे, दि. 4 - मुंबई आणि ठाणे परिसरात घरफोड्या करणाऱ्या टक्कुसिंग टाक (शिकलकर, रा. नारंगीफाटा, विरार, पालघर) याच्यासह शिकलकर टोळीतील पाच तसेच चार सराफ आणि अन्य टोळीतील चौघे अशा १३ जणांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या भिवंडी पथकाने जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून लुटीतील २६ लाखांच्या सोने चांदीसह ५५ लाख ८४ हजारांचा ऐवजही हस्तगत केल्याची माहिती पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली. त्यांनी आतापर्यंत १२ गुन्हयांची कबूली दिली आहे.विमलसिंग उर्फ राज टाक (२९, शिकलकर), विकी सिंग कलाणी उर्फ शिकलकर (२८, रामटेकडी, हडपसर, पुणे), घुंगरुसिंग तिलपिटीया उर्फ शिकलकर (४४, रा. वडोदरा, गुजरात) आणि किस्मतसिंग शिकलकर (३१, रा. धुळे ) या शिकलकर टोळीसह निरव उर्फ निशीत सोनी (३४, रा. धुळे), संदीप डहाळे (३५), विक्रम गलांडे (२८), पुरुषत्तोम दंडगव्हाळ उर्फ बापूशेठ (५५, रा. चौघेही नाशिक ) या चार सराफांनाही अटक करण्यात आली आहे. चोरीनंतर हे टोळके नाशिकच्या या सराफांकडे दागिन्यांची विक्री करीत होते. चोरीचा माल अल्प किमतीत घेऊन या टोळीला मदत केल्याप्रकरणी सराफांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून कापूरबावडी, मुंब्रा या भागातील चोऱ्या उघडकीस आल्या असून, ७५५ ग्रॅम सोने आणि १४ किलो ७०७ ग्रॅम चांदी असा २६ लाख दोन हजार ७६७ रुपये किंमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे. तर श्रीकृष्णा पांडे (३१, वसई), ललीत हरीजन (२२, वसई) आणि अजयकुमार उर्फ दुर्गाप्रसाद हरीजन (२२, वसईरोड, भिवंडी) या तिघांकडून गोदाम चोरीतील सात गुन्हे उघडकीस आले असून, त्यांच्याकडून २० लाख ९४ हजार ३८९ रुपयांचा माल हस्तगत केला आहे. त्यांनी भिवंडीतील प्लास्टीक दाणा गोदाम फोडले होते. त्यांना नवी मुंबई भागातून अटक करण्यात आली. याशिवाय, जमील सलमानी अहमद (२३, रा. नालासोपाला) यांच्याकडून भांडूप भागातील चोरी उघडकीस आली. एका नामांकित कंपनीच्या ट्रकचे आठ लाख ८७ हजार ३१५ रुपयांचा १०० टायर त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आले. ठाणे शहरातील वाढत्या घरफोड्यांच्या पार्श्वभूमीवर ठाणे, कल्याण आणि भिवंडी या भागातील चोऱ्या उघडकीस आणण्याचे आदेश पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी गुन्हे अन्वेषण विभागासह स्थानिक पोलिसांना दिले होते.सहायक पोलीस आयुक्त मुकुंद हातोटे यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी पथकातील वरीष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांच्या पथकाने खबऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पुणे, गुजरात आणि पालघर भागातून या सर्वांना अटक करण्यात आली आहे.  पोलिसांनी सीसीटीव्ही लावण्याचे आवाहन अनेक सराफाच्या व्यापाऱ्यांना केले होते. याच पार्श्वभूमीवर अनेकांनी असे सीसीटीव्ही लावले. दिवा, कापूरबावडी येथील एका सीसीटीव्हीत हे टोळके आढळल्यानंतर त्यांचा शोध घेण्यात आल्याचे मणेरे यांनी सांगितले. मोबाईल न वापरता पोलिसांना चकवाशिकलकर टोळीतील टक्कुसिंग आणि त्याचे साथीदार पोलिसांना चकवा देण्यासाठी मोबाईलचा वापर करीत नव्हते. तसेच वारंवार राहण्याचे ठिकाणही बदलत होते, अखेर त्यांचा ठावठिकाणा लागल्यानंतर या सर्वांना वेगवेगळया ठिकाणांवरुन पकडण्यात आले.वाटणी झाल्यावर वेगळेएखाद्या ठिकाणी चोरी केल्यानंतर समान वाटणी करायची. त्यानंतर ते एकत्र न राहता वेगवेगळया ठिकाणी राहायला जात होते.