शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिंदे गटाचे दोन, राष्ट्रवादीचे एक, केंद्रातले एक मंत्री, तरीही आदिवासी महिलेची झाली भर रस्त्यात प्रसूती

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 07:09 IST

रुग्णवाहिका पोहोचली नाही, खड्ड्यांमुळे ओढावला दुर्दैवी प्रसंग

लोकमत न्यूज नेटवर्क  अलिबाग : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यात शिंदे गटाचे उदय सामंत, दीपक केसरकर हे दोन मंत्री, राष्ट्रवादीकडे तर आदिती तटकरे या महिला मंत्री, नारायण राणे यांच्यासारखे एक मोठे केंद्रीय मंत्री असतानाही कोकणातल्या अलिबाग तालुक्यात आदिवासी वाडीतील गर्भवती महिलेची भर रस्त्यात प्रसूती करण्याची नामुष्की आली आहे.  भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली. देश १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील गारभाट खुटगाईन या अदिवासी वाडीतील गर्भवती महिलेवर हा दुर्देवी प्रसंग ओढावला.

नागरिकांना सर्व मूलभूत सुविधा देत असल्याचा दावा शिंदे सरकार करत असले तरी आदिवासी वाडीवरील रस्त्याची परिस्थिती विदारक आहे. अलिबाग तालुक्यातील कुर्डूस ग्रामपंचायत हद्दीत डोंगर भागात गारभाट खुटगाईन ही आदिवासी वाडी आहे. 

अदिवासीवाडीतील यशोदा गणपत केवारी ही सात महिन्यांची गर्भवती होती. ७ ऑगस्ट रोजी तिच्या पोटात दुखू लागले. या वाडीवर जाणारा रस्ता हा खड्डेयुक्त असल्याने रुग्णवाहिका पोहोचू शकत नव्हती. अखेर या महिलेला घेऊन तिचे नातलग एका छोट्या टेम्पोतून हॉस्पिटलमध्ये जात होते. मात्र, गाडीत मोठ्या प्रमाणात गचके बसू लागले. त्यामुळे यशोदाच्या वेदना वाढू लागल्या. तिच्या या अवस्थेमुळे नातलग भयभीत झाले. अखेर रस्त्याच्या बाजूला टेम्पो थांबवावा लागला. आजूबाजूच्या महिला धावून आल्या. अखेर रस्त्यातच यशोदेने बाळाला जन्म दिला. 

मात्र, या घटनेमुळे नातलग आणि नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. संतप्त महिलेच्या कुटुंबीयांनी पंचायत व आरोग्य विभागाला याबाबत जाब विचारला असता उडवाउडवीची उत्तरे वाट्याला आले, असे नातेवाइकांचे म्हणणे आहे.

कुर्डूस प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. आरोग्य केंद्रातील डॉक्टरांनी पुढील सोपस्कार केले. यशोदा आणि तिचे बाळ सुखरूप आहेत. 

महिलेला सातव्या महिन्यांपर्यंत प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार केले जात होते. ४ ऑगस्ट रोजीही ती तपासणी करून गेली होती. तिची प्रसूतीची वेळ पुढील दोन महिन्यांनी होती. मात्र, वेळेआधीच तिची प्रसूती झाली. सदर वाडीवर रुग्णवाहिका जाण्यास रस्ता नसल्याने तिला छोट्या टेम्पोतून आणले जात होते. तिची प्रसूती झाल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करून घेत योग्य ते उपचार केले जात आहेत. - डॉ. मनीषा विखे, जिल्हा आरोग्य अधिकारी