मुंबई : जुहू कोळीवाड्याच्या टोकालगत खवळलेल्या समुद्रात पोहायला गेलेल्या समीर शेख (१७) आणि राजेश चौधरी (२०) या दोघांचा शुक्रवारी दुपारी बुडून मृत्यू झाला. त्यांच्यासोबत पोहायला उतरलेले अन्य तीन मित्र सुदैवाने यातून बचावले आहेत. दोन महिन्यांतील येथील बुडण्याची ही चौथी घटना आहे. सध्या जुहू बीचवर आठ जीवरक्षक आहेत. यंदा पाऊस जास्त पडण्याचा अंदाज असल्याने या बीचवर ४५ जीवरक्षकांची गरज असल्याचेही अग्निशामक दलाचे येथील वरिष्ठ जीवरक्षक मनोहर शेट्टी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
जुहू येथील समुद्रात दोघे बुडाले
By admin | Updated: June 11, 2016 06:36 IST