शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
4
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
5
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
6
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
7
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
8
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
9
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
10
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
11
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
12
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
13
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
14
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
15
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
16
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
17
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
18
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
19
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
20
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल

पानसरे हल्ल्याचा दोन दिवसांत छडा

By admin | Updated: February 18, 2015 23:42 IST

पोलीस अधीक्षक शर्मा : महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याची सूत्रांची माहिती

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्यावरील खुनी हल्ल्याचा दोन दिवसांत छडा लावला जाईल. त्यासाठी जखमी उमा पानसरे यांचा जबाब महत्त्वपूर्ण असून, तो लवकरच घेण्याचा प्रयत्न आमच्याकडून सुरू आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी बुधवारी दिली. दरम्यान, दोन दिवसांच्या तपासामध्ये हाती लागलेले महत्त्वाचे धागेदोरे पोलीस अतिशय बारकाईने व तांत्रिकदृष्ट्या तपासून पाहत आहेत. हे प्रकरण अतिशय गुंतागुंतीचे असल्याने पोलिसांनी तपासाबाबत अतिशय गोपनीयता पाळली असल्याचे सूत्रांनी सांगितले. हल्लेखोर सोमवारी सकाळी ९.२४ च्या सुमारास मोटारसायकलवरून येत असल्याचे चित्रीकरण सरस्वती चुनेकर विद्यामंदिरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पोलिसांना मिळाले आहे. त्यानुसार ते कोठून आले, याची खात्री करण्यासाठी शहरातील टोलनाके व पानसरे यांच्या निवासस्थानाकडे येणाऱ्या सर्व मार्गांवरील सीसीटीव्हींचे फुटेज पोलिसांनी मिळविले आहे. राज्यभरातील पोलिसांची २० पथके हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. यासंदर्भात पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांनी सांगितले की, ‘रुग्णालयामध्ये उमा पानसरे यांचा जबाब घेण्यासाठी गेलो होतो. त्यांना मी ‘आई, मला ओळखता का?’ असे विचारले. त्यावर त्यांनी ‘हां, ओळखते’ असे सांगितले. त्यानंतर डॉक्टरांनी त्या अद्यापही धक्क्यातून सावरलेल्या नाहीत. त्यांचा जबाब घेण्यासाठी थोडा वेळ द्या,’ असे सांगितल्याने त्यांचा जबाब घेतला नाही. लवकरच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांचा जबाब आम्ही घेणार आहोत. हल्ला कोणी केला? याचा पोलीस शोध घेत आहेत; परंतु कोणापासून धोका होता, असे कोण करू शकते, याची महत्त्वपूर्ण माहिती उमा पानसरे यांच्या जबाबातून मिळणार आहे.’ (प्रतिनिधी)ताण हलकासायंकाळी पानसरे यांची स्नुषा मेघा, त्यांची कन्या स्मिता व मेघा यांच्यासह जावई बन्सी सातपुते, प्रा. विलास रणसुभे, मिलिंद कदम, सतीश कांबळे, सुनील जाधव, निहाल शिपूरकर, डॉ.चैतन्य शिपूरकर आदींची एकत्रित भेट झाली. आज मनावरील ताण खूप कमी झाल्याची प्रतिक्रिया मेघा पानसरे यांनी व्यक्त केली. प्रकृतीचा धोका टळला असून आता तपासाचे पुढे काय होणार, हीच आमची चिंता असल्याचे मेघा पानसरे यांनी सांगितले.गोविंद पानसरे शुद्धीवर; प्रकृतीत आणखी सुधारणाज्येष्ठ पुरोगामी नेते गोविंद पानसरे यांची प्रकृती झपाट्याने सुधारत असून बुधवारी ते शुद्धीवर आले. त्यांच्या प्रकृतीचा धोका पूर्णत: टळला आहे. कृत्रिम श्वासोच्छ्वास सुरू असल्याने त्यांना बोलता येत नसले तरी त्यांनी सकाळी स्नुषा मेघा यांना त्यांनी खुणेनेच आपण बरे असल्याचे सांगितले. त्यामुळे पानसरे कुटुंबीयांसह त्यांच्या प्रकृतीकडे डोळे लावून बसलेल्या राज्यभरातील कार्यकर्त्यांना दिलासा मिळाला. त्यांच्या पत्नी सौ. उमा पानसरे यांची प्रकृतीतही सुधारणा झाली असून पोलिसांनी सायंकाळी त्यांचा काही वेळ जबाबही घेतला. पानसरे दांपत्यावर सोमवारी दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला होता त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर येथील शास्त्रीनगरातील अ‍ॅस्टर आधार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोघांचीही प्रकृती सुधारत असल्याने पानसरे कुटुंबीयांवरील व त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांवरील ताण कमालीचा हलका झाला. बुधवारी रुग्णालयातील गर्दीही कमी झाली.