ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. ११ - नंदुरबार सुरत-भुसावळ लोहमार्गावरील ढेकवद पाचोराबारी गावाजवळ जास्त पावसाने रूळ जमिनीत खचल्याने नंदुरबार-सुरत लोकलचे दोन डबे घसरले.
पाच प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले असून, पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प असून ओखा पुरी, प्रेरणा एक्सप्रेस तसेच अन्य लोकल रेल्वे रद्द झाल्या आहेत. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.