शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यातील कळवा खाडीत बुडून दोन मुलांचा मृत्यू

By admin | Updated: May 3, 2017 17:08 IST

ठाण्यातील मनीषानगर येथे असलेल्या कळवा खाडीत बुडून दोन मुलांचा मृत्‍यू झाल्याची घटना बुधवारी घडली.

ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 03 - ठाण्यातील मनीषानगर येथे असलेल्या कळवा खाडीत बुडून दोन मुलांचा मृत्‍यू झाल्याची घटना बुधवारी घडली. 
मिळालेल्या माहितीनुसार, कळवा खाडीत चार मुले पोहण्यासाठी गेली होती. त्यावेळी चार मुलांपैकी तिघे जण पाण्यात पोहण्यासाठी उतरली. यावेळी पोहता-पोहता काहीवेळानंतर तिघेही बुडाले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच येथील स्थानिकांनी लगेचच ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन दलाला पाचारण केले.यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन दलाच्या जवानांना तीन मुलांपैकी एका मुलाला वाचविण्यात यश आले. तर, दोन जणांचा मृतदेह खाडीतून बाहेर काढला. 
दरम्यान, कुलदीप विनोद राहोदीया आणि बजींदर सुरेंद्र सहानी अशी या खाडीत बुडून मृत्‍यू झालेल्‍या मुलांची नावे  आहेत. तर, तिस-या मुलावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
तसेच, या मुलांना वाचवताना अग्निशमन दलाचे फायरमन रवी पवार यांच्या पायाला काच लागल्याने ते किरकोळ जखमी झाले. त्यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार करण्यात आले.