जामखेड (जि. अहमदनगर) : दिवाळीनिमित्त आई- वडील आणि मामांना भेटण्यासाठी निघालेल्या जामखेड व आष्टी येथील दोघांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या दुचाकीला पाथर्डी शेवगाव रस्त्यावरील फलकेवाडी येथे ट्रकने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला.संजय विक्रम ओमासे (३२, रा. पिंपरखेड, ता. जामखेड) व हनुमंत माणिक सानप (२७, रा. कासेवाडी, ता. आष्टी) हे नातलग असून सोमवारी सायंकाळी आई- वडिलांना भेटण्यासाठी ते आष्टी येथून दुचाकीने कुकाणा (ता. नेवासा) येथे चालले होते. फलकेवाडीजवळ समोरून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यात ते जागीच ठार झाले. मंगळवारी सकाळी शेवगावच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. (प्रतिनिधी) ।मजुराचा मृत्यूवाशिम : मंगरुळपीर नगरपरिषदेतर्फे बांधकाम सुरू असलेल्या पाण्याच्या टाकीवरून पडून मंगळवारी दुपारी परभणीतील इमरान (१९) या मजुराचा जागीच मृत्यू झाला.
ट्रकच्या धडकेत दोन दुचाकीस्वार ठार
By admin | Updated: November 2, 2016 05:15 IST