शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत
2
स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत
3
"तिला कितीदा समजावले, तरीही दुसऱ्या मुलांशी बोलत राहिली"; संतापलेल्या प्रियकराने असा काढला राग अन्...
4
...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी
5
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹३०,२२८ रुपयांचं फिक्स व्याज, पाहा स्कीमच्या डिटेल्स
6
रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु
7
रशिया-युक्रेन युद्धालाही मिळणार पूर्णविराम? 'या' दिवशी डोनाल्ड ट्रम्प घेणार पुतिन यांची भेट
8
तरुण असो वा वृद्ध.., पोस्टाच्या या जबरदस्त स्कीमनं घरबसल्या करू शकता कमाई; 'या' ट्रिकनं दरवर्षी मिळतील ₹१,११,०००
9
मृत अर्थव्यवस्था? मग हा वाढीचा ७% वेग कोणाचा हो राष्ट्राध्यक्ष ट्रम्प? अरविंद पनगढियांचा पलटवार
10
राहुल गांधी, आव्हान स्वीकारा! ...जेणेकरून ‘दूध का दूध, और पानी का पानी’ होईल.
11
उत्तरकाशीतून ६५० लोकांना बाहेर काढण्यात यश; ३०० लोक अजूनही अडकल्याची भीती, धरालीमध्ये बचावकार्य सुरू
12
Raksha Bandhan Shubh Muhurt: राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय...
13
"राखी आहे, पण मिठी नाही...", रुचिता जाधवची रक्षाबंधननिमित्त भावासाठी खास पोस्ट
14
नरसिंह रावांसारखे धाडस नरेंद्र मोदी दाखवतील?
15
डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आणखी एक युद्ध संपवल्याचा दावा! ३७ वर्षांच्या युद्धाला मिळाला पूर्णविराम
16
राहुल गांधींचा दावा फॅक्ट चेकमध्ये निघाला खरा, एकच व्यक्ती ४ ठिकाणी मतदार, नंबर सारखाच
17
सावत्र आईसुद्धा 'आई'च! तिलाही पेन्शनचा हक्क हवा : सर्वोच्च न्यायालय
18
स्टॅलिन म्हणाले, आम्ही केवळ तामिळ, इंग्रजी भाषा सुरू ठेवणार; केंद्राच्या एनईपीविरोधात राज्याचे नवे शैक्षणिक धोरण 
19
आजचे राशीभविष्य, ०९ ऑगस्ट २०२५:सुखद बातमी मिळेल, आनंदी राहाल! असा जाईल आजचा दिवस
20
ओबीसी क्रिमिलेअर उत्पन्न मर्यादेचा, दर ३ वर्षांनी आढावा घ्या; इतर मागासवर्गीयांसाठी नियुक्त समितीची शिफारस

दहा वर्षांत वीज निर्मितीत दुपटीने वाढ

By admin | Updated: August 21, 2015 22:57 IST

१२ हजारावरून २३ हजार मेगावॉट विजेची निर्मिती.

विवेक चांदूरकर/ अकोला : दिवसेंदिवस महावितरणच्या ग्राहकांची संख्या वाढत असून, विजेचा वापरही वाढत आहे. गत दहा वर्षांमध्ये राज्यातील विजेची मागणी १२ हजार मेगावॉटने वाढली आहे. त्यामुळे ऊर्जा मंत्रालयाच्या वतीने वीज निर्मितीवरही भर देण्यात येत आहे. दहा वर्षांमध्ये महानिर्मिती, केंद्रीय व खासगी ऊर्जानिर्मिती प्रकल्पांद्वारे वीज निर्मितीत दुपटीने वाढ झाली आहे. २00५-0६ मध्ये १२,४९६ मेगावॉट वीज निर्मिती होत होती, आता २३,५२८ मेगावॉट विजेची निर्मिती करण्यात येत आहे. अन्न, वस्त्र, निवारासोबतच आता वीजही मानवाची गरज झाली आहे. राज्यात सध्या २ कोटी ३0 लाख वीज ग्राहक आहेत. २0१५ मध्ये मे महिन्यात सर्वात जास्त १७ हजार मेगावॉट विजेची मागणी नोंदविली गेली. जसजशी विजेची गरज वाढत आहे, तसतशी विजेची निर्मितीही वाढविण्यावरही शासनाच्या वतीने भर देण्यात येत आहे. त्यामुळे गत दहा वर्षांमध्ये राज्यात शासकीय व खासगी अशा ३0 विद्युत निर्मिती प्रकल्पांच्या माध्यमातून विजेची निर्मिती वाढविण्यावर भर देण्यात आला. यादरम्यान काही विद्युत निर्मिती केंद्रांची क्षमता वाढविण्यात आली, तर काही नवीन प्रकल्प सुरू करण्यात आले. यामध्ये पारस, विंध्याचल, तारापूर, परळी, दाभोळ, सिपत, महालगाव, घाटघर, कोरबा, भुसावळ, खापरखेडा, अदानी पॉवर, इंडिया बुल्स आदी वीज निर्मिती प्रकल्पांचा समावेश आहे. दहा वर्षांपूर्वी राज्यात १२ हजार ४९६ मेगावॉट विजेची निर्मिती होत होती. आता यामध्ये दुपटीने वाढ होऊन २३ हजार ५२८ मेगावॉट विजेची निर्मिती होत आहे. दाभोळ येथील वीज निर्मिती मे २0१४ पासून बंद असल्यामुळे १९६७.0८ मे. वॉ. वीज उपलब्ध होत नाही.