शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार, खासदार 'मैदाना'त, उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत दिला पाठिंबा
2
मराठा बांधवांनो, फक्त १० रुपयांत मुंबईत राहा, अशी आहे शक्कल
3
उर्जित पटेल आयएमएफच्या कार्यकारी संचालकपदी
4
मुसळधार पावसाचा सामना करत मुंबईमध्ये लोटला 'मराठा'सागर
5
विजयाशिवाय मागे हटणार नाही, सरकारने सहकार्य केले, आपणही सहकार्य करू : जरांगे पाटील
6
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
7
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
8
जेवणात भाजी का बनवली नाही? पतीने पत्नीला रागात विचारलं; चिडलेल्या पत्नीने टोकाचं पाऊल उचललं!
9
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
10
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
11
५० कोटींची अत्याधुनिक इमारत; CM योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उत्तर प्रदेश निवडणूक आयोगाच्या नवीन कार्यालयाचे भूमीपूजन!
12
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
13
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
14
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
15
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
16
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
17
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
18
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
19
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
20
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका

रोज २० टॅँकर मैला थेट पंचगंगेत

By admin | Updated: June 4, 2015 00:58 IST

महापालिकेचा टँकर पकडला : जयंती नाल्यावर ‘प्रजासत्ताक’, ’स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांचा उपायुक्तांना घेराव

कोल्हापूर : गेले तीन दिवस ओसंडून वाहणाऱ्या जयंती नाल्यातून मैला थेट पंचगंगेत मिसळत असल्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. प्रजासत्ताक सामाजिक संस्थेचे दिलीप देसाई व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांसमक्ष मैला सोडणाऱ्या टॅँकरला रंगेहात पकडले. यानंतर पंचनामा करण्यासाठी आलेल्या महापालिका अधिकाऱ्यांना धारेवर धरत त्यांच्या अंगावर कार्यकर्ते धावून गेले. रोज वीसहून अधिक टॅँकर मैला पंचगंगेत मिसळत असल्याच्या संशयावरून मंडळाने महापालिकेला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली.सकाळी अकराच्या सुमारास प्र्रिन्स शिवाजी गार्डनसमोरील जयंती नाल्यावर मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरल्याचे समजताच ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांसह दिलीप देसाई घटनास्थळी पोहोचले. यावेळी एम०९ बीसी १५७४ या टॅँकरमधून नाल्याच्या पंपहाउसच्या आउटलेटमधून मैला नाल्यात सोडत असल्याचे आढळून आले. हे पाहून कार्यकर्ते आक्रमक झाले. तक्रारीनंतर घटनास्थळी आलेले प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी एन. एच. शिवांगी, उपायुक्त विजय खोराटे व जलअभियंता मनीष पवार यांना कार्यकर्त्यांनी अक्षरश: धारेवर धरले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे, बंडू पाटील, आदी उपस्थित होते. कार्यकर्त्यांना उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या पवार ाांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकारही घडला. आयुक्त घटनास्थळी आल्याखेरीज पंप हाउसमधून कोणालाही सोडणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. त्यामुळे येथील वातावरण अधिकच तणावपूर्ण बनले. दरम्यान, लक्ष्मीपुरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. उपायुक्त विजय खोराटे यांनी आठ तासांत जयंती नाल्यातून वाहणारे पाणी रोखण्याचे आश्वासन दिले. बंधाऱ्याची उंची वाढविण्यासाठी लवकरच प्रयत्न केला जाईल, असे सांगितले. कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे महापालिका प्रशासनाने लेखी आश्वासन दिले. नाल्यात ढकलून देऊकाही बांधकाम व्यावसायिकांचे हित सांभाळण्यासाठीच जयंती नाल्यावरील बंधाऱ्याची उंची वाढविण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप दिलीप देसाई यांनी केला. बंधाऱ्याची उंची वाढविण्यास चालढकल करणाऱ्या अधिकाऱ्यांना नाल्यात ढकलून देण्याचा इशारा ‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांनी दिला.