अहमदनगर : ऊसतोडणी कामगारांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सरकारकडे थकीत 2 हजार कोटींची देणी मिळविण्यासाठी राज्यातील 20 लाख ऊसतोडणी कामगार संपावर जात असल्याची माहिती राज्य ऊसतोडणी वाहतूक मुकादम कामगार युनियनचे अध्यक्ष गहिनीनाथ थोरे यांनी शनिवारी दिली. नगरसह राज्यातील साखर कारखान्यांकडून कामगारांना उचल मिळावी म्हणून आणि कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी आंदोलन पुकारण्यात आल्याचे थोरे म्हणाले.
शासनाने कामगारांना पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कामगार सुरक्षा योजनेचा लाभ द्यावा, ऊसतोडणी कामगारांच्या प्रचलित दरात आणि वाहतूकदरांच्या दरात दुप्पट वाढ करावी, कामगारांच्या मुलांसाठी निवासी आश्रम शाळा सुरू करण्यात याव्यात, करारात ठरल्याप्रमाणो टायर बैलगाडीचे भाडे 1क् रुपये ठरलेले असताना कारखान्यांनी 2क् रुपयांप्रमाणो कपात केली आहे. करण्यात आलेली ही कपात कामगारांना परत मिळावी.
नगरला तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. पी. अन्बलगन यांनी कामगारांच्या मुलांसाठी उन्नती प्रकल्प सुरू केला होता. यात त्यांच्या कुटुंबांना आणि पशुधनाला आरोग्य सुविधा आदी मागण्या केल्याचे थोरे म्हणाल़े