शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ट्विट केलं सोनू निगमनं, मनस्ताप मात्र सोनू सूदला

By admin | Updated: April 17, 2017 19:13 IST

सोशल मीडिया कोणासाठीही व्यक्त होण्यासाठी प्रभावी माध्यम ठरत आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 17 - सोशल मीडिया कोणासाठीही व्यक्त होण्यासाठी प्रभावी माध्यम ठरत आहे. कलाकारापासून ते राजकारण्यांपर्यंत समाजात घडणा-या निरनिराळ्या घटनांवर सोशल मीडियातील ट्विटर, फेसबुक सारख्या माध्यमांतून ब-याचदा प्रतिक्रिया उमटत असतात. मात्र याच सोशल मीडियावर कधी काय होईल हेसुद्धा सांगता येत नाही. ब-याचदा एकानं केलेल्या ट्विटचा दुस-यालाच मनस्ताप सहन करावा लागतो. असाच काहीसा प्रकार सोनू सूदसोबत झाला आहे.सोनू निगमनं सकाळीच सकाळी ट्विट करत मशिदींवरील भोंग्याद्वारे होणा-या अजानवर आक्षेप नोंदवला होता. "मी मुस्लिम नाही, तरीही सकाळी मला अजानमुळे उठावं लागतं. भारतात सक्तीची धार्मिकता कधी थांबवणार? ", असा प्रश्न सोनू निगमनं ट्विटरद्वारे उपस्थित केला होता. त्यानंतर युजर्स सोनू हे नाव वाचून सोनू निगमच्या ऐवजी सोनू सूदला ट्रोल करू लागले. सोनू सूदही ट्विट करत म्हणाला, मी अजूनपर्यंत आश्चर्यचकीत आहे. काय झालं आहे ?, कोण बोललं ?,  मला काय झालं आहे ते विचारत आहेत.
 
तत्पूर्वी स्नॅपचॅटच्या सीईओंनीही असंच वादग्रस्त ट्विट केलं होतं. आमचे अॅप गरीब भारतीयांसाठी नाही, असे सांगून भारतीयांची खिल्ली उडवणाऱ्या स्नॅपचॅटला त्यावेळी भारतीयांनी धडा शिकवला होता. स्नॅपचॅटचे सीईओ इव्हान स्पीगल यांनी भारतीयांबाबत आक्षेपार्ह उद्गार काढल्यानंतर त्यांना ट्रोल करण्यात आलं होतं. त्यावेळी ट्विटर आणि फेसबूकवर #boycottsnapchat  आणि #Uninstallsapchat हे हॅशटॅग ट्रेंड करत होते. त्यानंतर लोकांनी स्नॅपचॅटऐवजी स्नॅपडीलचं अॅप डिलीट केलं होतं.