तिच्या छळाने सासर व्यथित : पोलीसही चक्रावलेनरेश डोंगरे - नागपूरलग्नापूर्वी आणि लग्नानंतरही खोटी माहिती देऊन एका सरळमार्गी परिवाराला एका तरुणीने फसविले. फसवणूक उघड झाल्यानंतर ‘हुंड्यासाठी छळ करतात‘, असा आरोप लावून नवऱ्यासह वृध्द सासू-सासऱ्यांवर गुन्हे दाखल करवून घेतले. त्यानंतर ६० लाख रुपये मिळावे यासाठी तिने सासरच्या मंडळींना वेठीस धरले. ते न मिळाल्यामुळे पुन्हा नवऱ्याविरुद्ध खोटी तक्रार देऊन त्याला गजाआड करण्याचा प्रयत्न केला. महिला हिताच्या कायद्याचा दुरुपयोग करून एखादी महिला एखाद्या कुटुंबाचा कसा छळ करू शकते, त्याचा नमुना ठरलेली ही छळकथा टीव्हीची मालिका (सिरियल) नव्हे, तर एका परिवाराला उद्ध्वस्त करू पाहणारी अजनीतील ही रिअल स्टोरी आहे. बनवाबनवी उघडआठ महिन्याच्या कालावधीत प्रत्येकदा ती वेगवेगळी माहिती सांगत असल्याने संशय वाढला. त्यामुळे ती सांगत असलेल्या शैक्षणिक संस्थेत चौकशी केली असता शिला तेथे नोकरीला नसल्याचे स्पष्ट झाले. एवढेच नव्हे तर तिने घरच्यांना दिलेली मार्कशीटही बनावट असल्याचे उघडकीस आले. ही सर्व बनवाबनवी उघड झाल्यानंतर ती बिथरली. तिने थेट पोलिसांकडे तक्रार नोंदवली. नवरा, सासू-सासरे, नणंदा आणि त्यांच्या नवऱ्यावरही शिलाने हुंड्यासाठी छळत असल्याचा आरोप लावला. खोट्या तक्रारीवर गुन्हे दाखल खोट्या तक्रारीवर गुन्हे दाखल करून पापाचे भागीदार बनलेले पोलीसही चक्रावले आहेत. प्रकरणाची सुरुवात मार्च २०१० मध्ये झाली. दुबईत लठ्ठ पगारावर काम करणाऱ्या अजनीतील परागचे लग्न करण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांनी वधू शोध सुरू केला. मध्यस्थामार्फत गिट्टीखदानमधील एक स्थळ सुचविण्यात आले. मुलगी शिला (नाव बदलवलेले) बीएससी असल्याचे सांगण्यात आले. पहायला बऱ्यापैकी असल्यामुळे फारशी चौकशी न करता अन् कोणताही हुंडा न घेता परागच्या आईवडिलांनी परागचे मे २०१० मध्ये शिलासोबत लग्न लावून दिले. लग्नानंतर तिला दुबईला नेण्यासाठी पासपोर्ट आणि व्हिसा बनवावा म्हणून, पराग तिला शैक्षणिक कागदपत्रे मागू लागला. प्रत्येक वेळी वेगवेगळे कारण सांगून शिलाने वेळ मारून नेली. पत्नी येथे आणि आपण तेथे असे शक्य नसल्यामुळे परागनेच दुबईतील नोकरी सोडली. त्याला लगेच भंडारा जिल्ह्यात एका चांगल्या ठिकाणी नोकरी मिळाली. तो अपडाऊन करू लागला. इकडे शिलाने आपल्याला एका नामवंत महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून नोकरी लागल्याचे सांगितले. परागचा सरळमार्गी परिवार आनंदला. शिला इकडे सकाळी ९.३० वाजता ड्युटीवर जाते म्हणून घराबाहेर जाऊ लागली. महिन्यानंतर पगारातील काही रक्कमही घरच्यांना ‘दाखवू’ लागली. दुसऱ्याच महिन्यात बदली झाल्याचेही सांगितले. दागिने ठेवले गहाणगिट्टीखदान पोलिसांनी चौकशी सुरू केली. पोलिसात तक्रार दाखल होताच परागच्या वृध्द आईने अंथरुण पकडले. वडीलही हादरले. विवाहित दोन बहिणींचीही आरोपी म्हणून नावे असल्याने त्यांच्याही सुखी जीवनाला नजर लागल्यासारखी झाली. पोलिसांच्या चौकशीत छळाची तक्रार बोगस असल्याचे तपासकर्त्यांच्या लक्षात आले. बनावट मार्कशीट देणे, नोकरीवर नसताना नोकरीवर असल्याची बतावणी करून सकाळीच घरून बाहेर पडणे, या बाबीही उघड झाल्या. ती पगार मिळत असल्याचे सांगत होती, तो कुठून मिळतो, त्याची चौकशी केली असता आणखी एक धक्कादायक माहिती उजेडात आली. शिलाने घरातील दागिने गहाण ठेवले होते. गहाणाचे पैसे दाखवून ती पगार मिळाल्याचे सांगत होती. हे सर्व चौकशीत उघड झाल्यानंतर पोलीसही चक्रावले. महिलांचा छळ करणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठी अमलात आणलेला कायदा एखाद्या सरळमार्गी परिवाराला कसा उद्ध्वस्त करू शकतो, त्याची पुन्हा एकदा प्रचिती आली. कहानी मे व्टिस्ट!पोलिसात तक्रार, बदनामी झाल्यामुळे आता पुढची कारवाई टाळण्यासाठी नवरा आणि त्याचे नातेवाईक आपण म्हणू, ते मान्य करतील, असा गैरसमज झाल्यामुळे शिलाने त्यांना ‘सेटलमेंटसाठी’ ६० लाखांची मागणी केली. घरदार विकूनही एवढी रक्कम देणे शक्य नसल्यामुळे परागच्या कुटुंबीयांनी शिलाची मागणी फेटाळली. त्यामुळे तिने परागविरुद्ध पुन्हा एक तक्रार दिली. तक्रारीत परागने आपल्या साथीदारांमार्फत हल्ला करून ‘केस वापस घे नाही तर तुझ्या चेहऱ्यावर अॅसिड फेकीन‘ अशी धमकी दिल्याचे सांगितले. गिट्टीखदान पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला. चौकशी केली असता घटनेच्या वेळी पराग नागपुरात नव्हे तर, बाहेरगावी आपल्या ड्युटीवर असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून स्पष्ट झाले. दोष नसताना शिला हात धुवून पराग आणि त्याच्या कुटुंबीयांच्या मागे लागल्याने पोलीसही चक्रावले आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराला आळा बसावा म्हणून महिलांच्या हिताचे कायदे आहेत. मात्र, एखादी महिला अशा प्रकारे एखाद्या परिवारातील अनेक महिलांचा छळ करीत असेल, तर ‘तिच्याविरुद्ध‘ कायद्याचा वापर कशा पध्दतीने करावा, यावर आता पोलीस अधिकारी गंभीरपणे विचार करीत आहेत.(प्रतिनिधी)
टीव्ही सिरीयल नव्हे ही रिअल स्टोरी !
By admin | Updated: November 2, 2014 01:01 IST