वसई : राज्य माहिती आयोगाच्या आदेशानंतरही अपिलार्थीला माहिती देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी वसईचे प्रांताधिकारी दादाराव दातकर अडचणीत आले आहेत.जनता दलाचे तालुका कार्याध्यक्ष निमेश वसा यांनी १५ जानेवारी २०१५ ला महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ च्या कलम २५७ अन्वये दाखल असलेल्या प्रकरणांची माहिती प्रांताधिकारी दादाराव दातकर यांच्याकडे मागितली होती. ही माहिती न मिळाल्यामुळे राज्य माहिती आयोगाकडे वसा यांनी तक्रार केली होती. त्याची सुनावणी होऊन वसा यांचे अपिल मान्य करण्यात आले.त्यांना सात दिवसांत नस्ती निरीक्षणासाठी देण्यात येण्याचा आदेश राज्य माहिती आयुक्त थेकेकरा यांनी सुनावणी दरम्यान १७ मार्च २०१६ रोजी दिले. तसेच अपिलार्थीला १५ दिवसांत ५०० पानापर्यंतची माहिती टपालाने मोफत पाठवण्यात यावी. ही माहिती मिळाल्याची अपिलार्थीची पोहच आयोगाला पाठवावी. जन माहिती अधिकाऱ्याने वेबसाईट विकसित करून सर्व प्रकरणे त्यावर प्रसिद्ध करावी. नागरिकांची सनद सूचना फलकावर लावावी.असे या आदेशात नमूद करण्यात आले होते. (वार्ताहर)हि कारवाई पंधरा दिवसांत करण्याचे राज्य माहिती आयुक्तांने आदेश दिले होते. मात्र, आता या आदेशाला ४० दिवस उलटून गेले तरी वसा यांना माहिती देण्यात आलेली नाही.त्यामुळे राज्य माहिती आयोगाच्या आदेशाला दातकर यांनी केराची टोपली दाखवल्याचे स्पष्ट झाले आहे.
माहिती दडविल्यामुळे प्रांत अडचणीत
By admin | Updated: June 27, 2016 02:49 IST