शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
3
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
4
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
5
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
6
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
7
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
8
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
9
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
10
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
11
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
12
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
13
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
14
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
15
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
16
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
17
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
18
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
19
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
20
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस

राष्ट्रवादीची राष्ट्रीय मान्यता अडचणीत

By admin | Updated: June 20, 2014 02:22 IST

राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पार्टी (बसपा) व भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा) यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मान्यता गोठविण्यासंदर्भात नोटिसा बजावल्या आहेत.

निवडणूक आयोगाने बजावली नोटीस; ‘लोकमत’च्या वृत्तावर शिक्कामोर्तब 
सुधीर लंके - अहमदनगर
लोकसभा तसेच विविध राज्यांच्या विधानसभांमध्ये आवश्यक असणारी मते व जागा मिळालेल्या नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस, बहुजन समाज पार्टी (बसपा) व भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा) यांना केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रीय मान्यता गोठविण्यासंदर्भात नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी या तीन पक्षांचा राष्ट्रीय दर्जा जाणार हे जवळपास निश्चित आहे. 
 राष्ट्रीय दर्जा टिकविण्यासाठी असलेल्या विविध अटींची पूर्तता होत नसल्याने या पक्षांचा हा दर्जा धोक्यात आला असल्याचे वृत्त केवळ ‘लोकमत’ने 21 मे रोजी आकडेवारीसह प्रकाशित केले होते. ‘लोकमत’चा हा अंदाज बरोबर ठरला आहे. निवडणूक आयोगाचे प्रधान सचिव के.एफ. विलफर्ड यांनी पक्षांना नोटिसा बजावण्यात आल्याच्या वृत्तास दुजोरा दिला. राष्ट्रीय मान्यता गोठविण्यात का येऊ नये, यासंदर्भात या पक्षांचे म्हणणो मागविण्यात आले असून, ते सादर झाल्यानंतर पुढील कार्यवाही होईल, असे ते म्हणाले. या सुनावणीच्या प्रक्रियेला साधारण तीन महिन्यांचा कालावधी लागेल. त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी याबाबतचा निर्णय होईल. 
राष्ट्रीय मान्यता गोठल्यास राष्ट्रवादी हा राज्यात शिवसेना, मनसे या पक्षांसारखाच केवळ राज्यस्तरीय पक्ष म्हणून ओळखला जाईल. राष्ट्रवादीचे ‘घडय़ाळ’ चिन्ह राज्यात कायम राहील, परंतु राष्ट्रीय पक्ष म्हणून मतपत्रिकेवर असणारे वरचे स्थान त्यांना मिळणार नाही. 
बसपा व भाकपा या पक्षांना महाराष्ट्रात राज्य पक्ष म्हणूनही दर्जा नाही. त्यामुळे या पक्षांना येत्या विधानसभा निवडणुकीत आपले ‘हत्ती’ व ‘विळा-कणीस’ हे चिन्ह गमवावे लागणार आहे. चिन्ह हवे असेल तर त्यांना निवडणूक आयोगाकडे तसा अर्ज करावा लागेल. तरच ते त्यांना मिळू शकेल. 
लोकसभा निवडणुकीत बसपाला एकही जागा मिळाली नसून राष्ट्रवादीला सहा तर भाकपाला अवघी एक जागा मिळाली आहे. बसपाचा केवळ मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व उत्तराखंडमध्ये तर भाकपाला केवळ केरळ व तामिळनाडूत राज्य पक्षांचा दर्जा उरला आहे. 
 
राष्ट्रवादी नागालँडमध्येही अडचणीत 
च्राष्ट्रीय मान्यता धोक्यात आलेल्या राष्ट्रवादीला सध्या महाराष्ट्र व नागालँड या दोन ठिकाणीच राज्य पक्षाचा दर्जा उरला आहे. नागालँड विधानसभेच्या 2क्13च्या निवडणुकीत या पक्षाला चार जागा व सहा टक्के मते मिळाली होती. परंतु नुकतेच यातील तीन आमदार भाजपात गेल्याने येथील राज्य पक्ष म्हणून असलेला दर्जाही अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे ‘नॅशनॅलिस्ट’ म्हणविणारा हा पक्ष केवळ महाराष्ट्रापुरता उरण्याचा धोका आहे.
मान्यतेला धोका नाही 
च्पक्षाची चार वर्षाची सरासरी कामगिरी पाहून मान्यता ठरत असते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय मान्यतेला 2क्18र्पयत काहीही धक्का लागणार नाही, याबद्दल आम्हाला विश्वास आहे. 
च्निवडणूक आयोगाची नोटीस मिळालेली नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी सांगितले.