शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
2
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
3
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
4
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
5
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
6
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
7
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
8
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
9
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
10
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
11
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
12
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
13
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
14
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
15
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
16
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
17
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
18
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
19
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
20
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

‘निरर्थक’ जातपडताळणी बंद करा किंवा नवी कार्यक्षम पद्धत लागू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 05:44 IST

अक्षम्य विलंब व मनमानी : उद्विग्न हायकोर्टाची सरकारला सूचना, उद्देश खरोखर सफल झाला का याचा विचार करण्याची वेळ

- अजित गोगटे 

मुंबई : नोकरी, शिक्षण आणि निवडणूक यासाठी आदिवासी आणि मागासवर्गीय व्यक्तीने दिलेल्या जातीच्या दाखल्याची पडताळणी करण्यासाठीची व्यवस्था विलंब आणि मनमानी कारभार यामुळे गैरसोय व त्रासदायक ठरली असल्याने सरकारने एक तर ही पद्धत बंद तरी करावी अथवा नवी अधिक कार्यक्षम पद्धत आणावी, अशी सूचना उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली आहे.

न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने उद्विग्न होऊन एका निकालपत्रात लिहिले की, सरकारने जात पडताळणीसाठी केलेल्या कायद्यास लवकरच २० वर्षे पूर्ण होतील. हा कायदा सर्वंकष असल्याचा दावा केला जात असला तरी त्याचा उद्देश खरोखरच सफल झाला का, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. प्रत्येक वेळी पडताळणीसाठी मुदतवाढ देऊन या कायद्याचा कठोरपणा शिथिल केला जातो. त्यामुळे जातपडताळणीची मुदत कधीच पाळली जात नाही. परिणामी राखीव जागेवर निवडून आलेला उमेदवार प्रत्यक्षात आदिवासी किंवा मागासवर्गातील नसला तरी तो कार्यकाळ पूर्ण करतो. तसेच जातीच्या दाखल्याची पडताळणी न होता राखीव जागांवर प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण होते व नोकरीस लागलेला कर्मचारी पूर्ण सेवा करून सेवानिवृत्तही होतो.

न्यायालयाने म्हटले की, जातपडताळणी समित्यांकडून पडताळणीस विलंब होणे किंवा अर्जदारांचे दावे मनमानी पद्धतीने फेटाळले जाणे याबद्दल या न्यायालयात मुंबई, नागपूर व औरंगाबाद येथे दरवर्षी दाखल होणाऱ्या शेकडो प्रकरणांवरून हिच विदारक स्थिती स्पष्ट होते. त्यामुळे एक तर सरकारने हा पडताळणीचा कायदा रद्द करून प्रकरणे पुन्हा पूर्वीप्रमाणे दिवाणी न्यायालयात नेण्याची व्यवस्था करावी किंवा आदिवासी व मागासवर्गीयांचे आरक्षण आणि त्यांना दिल्या जाणाºया सोयी-सवलती फक्त त्यांनाच मिळतील व अन्य कोणी तोतयेगिरी करून त्या लुबाडू शखणार नाही याची खात्री करण्यासाठी प्रचलित पडताळणी पद्धतीत आमुलाग्र सुधारणा करावी. आरक्षण संपण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत असल्याने याचा गांभीर्याने विचार करण्याची जास्त गरज आहे.

खंडपीठाने म्हटले की, जातीचा दाखला सरकारच्याच सक्षम प्राधिकाºयाने दिलेला असला तरी त्याची समित्यांनी पुन्हा स्वतंत्रपणे पडताळणी करावी, अशी या कायद्याची व्यवस्था आहे. परंतु समित्या त्यांचे हे काम गांभीर्याने करत नाहीत, असे न्यायालयातील प्रकरणांवरून दिसून येते. आमच्याकडे पुरेसा कर्मचारीवर्ग व मुलभूत सुविधा नाहीत, अशा या पडताळणी समित्यांच्या तक्रारी आहेत. दहा-दहा वर्षे उलटली तरी जातीच्या दाखल्यांची पडताळणी होऊ शकत नाही.निकालपत्राची प्रत सामाजिक न्याय तसेच विधी व न्याय मंत्रालयाच्या सचिवांना पाठविण्याचेही निर्देश दिले गेले.जातपडताळणीसाठी शिक्षकाची १२ वर्षे फरपटन्यायालयाने वरील निकालपत्र जातपडताळणीसाठी तब्बल १२ वर्षे फरपट झालेल्या रवींद्र देवराम भोसले या शिक्षकाच्या याचिकेवर दिले. पुणे जिल्ह्यातील दौंड येथील वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज माध्यमिक विद्यालयात राखीव जागेवर २००७ मध्ये नोकरीस लागले. शाळेने नोकरीतून काढून टाकण्याची नोटीस दिल्यावर ते न्यायालयात आले. दाखला पडताळणीसाठी पुणे, ठाणे आणि नाशिक यापैकी नेमक्या कोणत्या समितीकडे पाठविला गेला, याचा घोळ केला. कागदपत्र गहाळ झाल्याचे सांगण्यात आले. अखेरीस ती सापडली व प्रकरण नाशिक समितीकडेच असल्याचे स्पष्ट झाले. भोसले यांच्यासाठी अ‍ॅड. रामकृष्ण मेंदाडकर व कोमल गायकवाड व समितीसाठी सहाय्यक सरकारी वकील एस. बी. कालेल यांनी काम पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय