शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

तुर्भे डम्पिंगप्रश्नी महसूलमंत्र्यांना साकडे

By admin | Updated: March 1, 2017 02:49 IST

गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळत असलेल्या तुर्भे डम्पिंग ग्राउंडच्या प्रश्नावर बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

नवी मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळत असलेल्या तुर्भे डम्पिंग ग्राउंडच्या प्रश्नावर बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी स्थानिक नगरसेवकांसह राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. डम्पिंगच्या दुर्गंधीतून या परिसरातील रहिवाशांची सुटका करावी, अशी विनंती केली. दरम्यान, यासंदर्भात लवकरच सकारात्मक तोडगा काढला जाईल, असे आश्वासन महसूलमंत्री पाटील यांनी दिल्याचे आमदार म्हात्रे यांनी कळविले आहे. तुर्भे येथील डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न पेटला आहे. या परिसरातील रहिवाशांनी त्याविरोधात आंदोलन छेडले आहे. डम्पिंगमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर हे डम्पिंग अन्यत्र हलवावे, अशी येथील रहिवाशांची जुनी मागणी आहे. आमदार मंदा म्हात्रे यांनी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी व औचित्याच्या मुद्द्याद्वारे हा प्रश्न उपस्थित केला होता, तसेच राज्य स्तरावर एकदा पाठपुरावा केला होता. त्यामुळे सरकारने यासंदर्भात अहवाल करण्याचे निर्देश महापालिकेला दिले होते. मात्र, महापालिकेने दिलेला अहवाल राज्य शासनाची दिशाभूल करणारा असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान, मंगळवारी स्थानिक नगरसेवक सुरेश कुलकर्णी, नगरसेविका राधा कुलकर्णी, नगरसेविका संगीता वास्के, मुद्रिका गवळी आदीसमवेत महसूल, मदत-पुनर्वसन व सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन या प्रश्नांवर चर्चा केली. तुर्भे येथील डम्पिंग ग्राउंडसाठी पर्यायी जागा उपलब्ध करण्याचा प्रस्ताव लवकरच तयार करण्यात येईल, असे आश्वासन महसूलमंत्री पाटील यांनी दिल्याचे आमदार मंदा म्हात्रे यांनी कळविले आहे. (प्रतिनिधी)