शहरं
Join us  
Trending Stories
1
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
2
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
3
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
4
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
5
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
6
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
7
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
8
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
9
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
10
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
11
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
12
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
13
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
14
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
15
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
16
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

तुळशी तलाव भरला

By admin | Updated: July 19, 2016 19:19 IST

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख तलावांपैकी तुळशी तलाव आज सकाळी ६ वाजता भरुन वाहू लागले. गेल्यावर्षीपेक्षा दोन महिन्यांआधीच हा तलाव यंदा भरला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 19 -  मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या प्रमुख तलावांपैकी तुळशी तलाव आज सकाळी ६ वाजता भरुन वाहू लागले. गेल्यावर्षीपेक्षा दोन महिन्यांआधीच हा तलाव यंदा भरला आहे.  मात्र आणखी काही तलावं भरुन वाहेपर्यंत पाणीकपात कायम राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना आणखी काहीकाळ पाणीकपातीची झळ सहन करावी लागणार आहे. गेल्यावर्षी मुंबईकरांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागला होता. त्यामुळे आॅगस्ट २०१५ पासून मुंबईत २० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली़ यावर्षी पाऊस जोरदार असल्याने तलावांमधील जलपातळी झपाट्याने वाढत असल्याने पाणीकपात रद्द करण्याची मागणी जोर धरीत आहे.  त्यात आज सकाळी तुळशी तलाव भरुन वाहू लागला. गेल्यावर्षी हा तलाव २२ सप्टेंबर रोजी भरला होता. तसेच तलावांमध्ये सात लाख ५२ हजार दशलक्ष लीटर जलसाठा जमा झाला आहे़ त्यामुळे पाणीकपात मागे घेण्याची मागणी पुन्हा एकदा होऊ लागली आहे. परंतु तुळशी तलावातून मुंबईची केवळ एक टक्काच तहान भागेल़ उर्वरित ९९ टक्के पाण्याची तजवीज करणारी तलावं भरेपर्यंत पाणीकपात मागे घेण्याचा प्रस्ताव नसल्याचे, अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी स्पष्ट केले.

- मुंबईला दररोज ३७५०दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो़.

- गेल्या वर्षी आॅगस्ट महिन्यापासून पाणीकपात सुरु असल्याने ३२५० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा दररोज होत आहे.

- मुंबईला वर्षभर पाणीपुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ आॅक्टोबर रोजी १४ लाख दशलक्ष लीटर जलसाठा असणे अपेक्षित आहे.

जलसाठ्याची आकडेवारी मीटर्समध्ये

तलाव-  कमाल...  किमान...  आजची स्थिती... आजचा पाऊस(मि़मी़)

मोडक सागर १६३़१५१४३़२६१५६़१५६५़००

तानसा१२८़६३११८़८७१२५़५२३९़२०

विहार८०़१२७३़९२७७़५२११२़२०

तुळशी१३९़१७१३१़०७१३९़३०९०़००

अप्पर वैतरणा ६०३़५१५९५़४४५९८़७६२७़००

भातसा१४२़०७१०४़९०१२८़२६४८़००

मध्य वैतरणा २८५़००२२०़००२६८़१०२१़६०

एकूण २०१६ -७५२४४५ दशलक्ष लीटर २०१५- २६९१३७ दशलक्ष लीटर