तुळजापूर : श्री तुळजाभवानी नवरात्रौत्सव काळात भाविकांना घाटशीळमार्गे मंदिरात प्रवेश देण्याच्या निर्णयाविरोधात तुळजापुरातील व्यापारी, भाविकांसह सर्वपक्षीयांनी शनिवारी शहर बंदची हाक दिली. या बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. नवरात्रौत्सवात परंपरागत मार्गाने श्री भवानीमातेच्या भक्तांना दर्शनास सोडावे, भवानी रोड ते महाद्वार ते कल्लोळ तीर्थ, गोमुख तीर्थ, नारदमुनी मंदिर, गणपती मंदिर, होमकुंड या उपदेवतांचे दर्शन झाल्यानंतरच भवानीमातेचे दर्शन घेऊन विधी करण्याची परंपरा आहे. मात्र, प्रशासन विधीविरोधी निर्णय घेत असल्याचा आरोप निवेदनात केला आहे.
तुळजापुरात बंद
By admin | Updated: September 4, 2016 00:39 IST