शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
7
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
8
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
9
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
10
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
11
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
12
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
13
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
14
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
15
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
16
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
17
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
18
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
19
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
20
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
Daily Top 2Weekly Top 5

तुकाराम मुंढेंची पुन्हा बदली; भाजपाला अडचणीत आणण्यासाठी ठाकरे सरकारची खेळी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 20:25 IST

नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी मुंढेंची नियुक्ती

नागपूर: सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली आहे. सध्या एड्स नियंत्रण सोसायटीच्या प्रकल्प संचालक पदावर कार्यरत असणाऱ्या मुंढेंची आता नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आहे. त्यामुळेच मुंढेंची आयुक्तपदी वर्णी लावण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. 

दोन वर्षात नागपूर महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंढेंकडे नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आल्याचं बोललं जात आहे. कायद्याच्या चौकटीत राहून काम करणारे अधिकारी अशी मुंढेंची ओळख आहे. मुंढे जिथे जातात, तिथे त्यांच्यात आणि सत्ताधाऱ्यांमध्ये वाद होतो, हे अनेकदा पाहायला मिळालं आहे. मुंढे यांच्या कामकाजाची पद्धत सत्ताधाऱ्यांच्या पचनी पडत नाही. त्यामुळेच त्यांच्याकडे भाजपाची सत्ता असलेल्या नागपूर महापालिकेचं आयुक्तपद देण्यात आल्याची चर्चा आहे. 

याआधी डिसेंबर २०१८ मध्ये तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटीच्या प्रकल्प संचालकपदी नियुक्ती करण्यात आली होती. तत्पूर्वी मुंढे नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी कार्यरत होते. पुणे पालिका परिवहन सेवेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी असतानादेखील मुंढेंनी धडाकेबाज कामगिरी केली होती. परिवहन सेवेला शिस्त लावण्यासाठी त्यांनी अनेक प्रयोग केले. अतिशय कर्तव्यकठोरपणे काम करत असल्यानं त्यांच्याविरोधात तक्रारीदेखील करण्यात आल्या. 

पुणे पालिका परिवहन सेवेच्या व्यवस्थापकीय संचालकपदावरुन मुंढेंची नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदावर नियुक्ती करण्यात आली होती. तिथेही त्यांनी आपली धडाकेबाज कामगिरी सुरूच ठेवली. त्यामुळे सत्ताधारी आणि मुंढेंमध्ये संघर्ष टोकाला पोहोचला होता. तेथून २२ नोव्हेंबर २०१८ रोजी मुंढेंची मुंबईत राज्याच्या नियोजन विभागाच्या सहसचिवपदी करण्यात आली होती. मात्र महिना उलटण्यापूर्वीच त्यांची पुन्हा बदली करण्यात आली होती.