शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

'तिरुपती देवस्थानचा आदर, पण छत्रपती शिवाजी महाराज आमच्यासाठी दैवत आहेत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2022 18:59 IST

'तिरुपती देवस्थानाला विनंती आहे की, महाराजांचे फोटो-मूर्ती काढणे थांबवा नाहीतर महाराष्ट्रातील तरुणांच्या रागाला सामोर जावं लागेल.'

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजी देवस्थान चर्चेत आले आहे. चर्चेत येण्याचे कारण म्हणजे, काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील एक व्यक्ती तिथे गेला असता, त्याच्या गाडीमध्ये लावलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे स्टिकर/मूर्ती काढायला लावली. त्या व्यक्तीने या घटनेचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर शेअर केला होता. तेव्हापासून सोशल मीडियावर महाराष्ट्रातील लोकांकडून तिरुपती देवस्थानाबद्दल प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे. याप्रकरणी मनसे नेते अविनाश जाधव यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे.

'महाराज आमच्यासाठी देवाच्या स्थानी'फेसबूकवर व्हिडिओद्वारे जाधव म्हणाले की, 'मागील काही दिवसांपासून एक प्रकार घडतोय. आपल्या महाराष्ट्रातली अनेक लोक खासगी गाडीने तिरुपतीला जातात. यातील बहुतेक गाड्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती लावलेली असते. आपण महाराजांना देवाच्या स्थानी पाहतो, अनेकजण गणपतीऐवजी महाराजांची मूर्ती लावतात. पण, गेल्या काही दिवसांपासून तिरुपती देवस्थानाला गेल्यानंतर तिथे महाराजांची मूर्ती काढली जात आहे. यामागे नेमकी काय मानसिकता आहे, हे माहित नाही.'

'...तर वाद होणार''माझी तिरुपती बालाजीवर प्रचंड श्रद्धा आहे. मी वर्षातून 5-6 वेळा तिरुपतीला जातो. तिथे तिथले लोक त्यांच्या भाषेत बोलतात, त्यांना त्यांच्या भाषेवर अभिमान आहे. ते मान्य केलं, पण महाराजांची मूर्ती काढणे, फोटो काढणे, यात कोणती मर्दानगी आहे. माझी महाराष्ट्र शासनाला विनंती आहे, तिथल्या प्रशानाला याबद्दल बोललं पाहिजे. कारण, हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. हे सतत होत राहिलं, तर वाद होत राहणार. त्यामुळे तिथल्या प्रशासनाला बोलून मार्ग काढावा,' असं जाधव म्हणाले.

'तुमच्याही गाड्या महाराष्ट्रात येतील''कुठलाही वाद होऊ नये, अशी आमची इच्छा आहे. तिरुपती बालाजीला जेवढं मानतात, तेवढंच महाराजांनाही मानणारी लोक आहे. त्यामुळे दोन देवांमध्ये वाद होऊ नये. आमची श्रद्धा आमच्याकडे राहू द्या, आम्ही आमच्या गाड्यांवर महाराजांचे स्टिकर आणि मूर्ती लावत आहोत. तुमच्या गाड्यांमध्ये महराजांचे स्टिकर लावत नाहीयेत. अशा घटना पुढे होऊ नये, नाहीतर महाराष्ट्रातला तरुण शांत बसणार नाही. उद्या तुमच्याही गाड्या महाराष्ट्रात येती,' असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. 

टॅग्स :tirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटAvinash Jadhavअविनाश जाधवShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज