लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : लग्नात काहीच दिले नाही, या कारणावरून विवाहितेचा छळ करून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीसह कुटुंबीयांवर सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी प्रियांका प्रतीक वाघोलीकर ( वय २२, धनकवडी) हिने फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिचे पती प्रतीक अशोकराव वाघोलीकर (वय २९), प्रसाद अशोक वाघोलीकर (रा. नटराज रेसिडन्सी, तीनहत्ती चौक) यांसह ३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न झाल्यापासूनच माहेरच्यांनी काहीच दिले नाही, मानपान केला नाही, लग्नात काहीच दिले नाही या कारणावरून सासरच्या मंडळींकडून तिचा वारंवार अपमान केला जायचा. शिवीगाळ आणि मारहाण करून तिचा मानसिक व शारीरिक छळ केला जात असे. वायफाय बंद केल्याच्या कारणावरून पतीने संतप्त होऊन फिर्यादीच्या तोंडावर उशी दाबून व तिचा गळा आवळून डोक्यात कुंडी मारून तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. एस थोरात करीत आहेत.
विवाहितेला जिवे मारण्याचा प्रयत्न
By admin | Updated: May 14, 2017 00:47 IST