शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक चेहरा बदलण्याचा प्रयत्न

By admin | Updated: December 26, 2016 03:51 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला साचेबद्ध चौकटीतून बाहेर काढीत गर्दीकडून दर्दीकडे प्रवास घडविण्याच्या

पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला साचेबद्ध चौकटीतून बाहेर काढीत गर्दीकडून दर्दीकडे प्रवास घडविण्याच्या दृष्टीने साहित्य महामंडळाने सकारात्मक पावले उचलली असून, यंदाच्या डोंबिवली येथे होणाऱ्या ९0व्या साहित्य संमेलनात टॉक शो, बालकुमार मेळावा, बोलींवरील परिसंवाद, युद्धस्थ कथा, प्रतिभायन, आंतरभारती’ अशा नावीन्यपूर्ण कार्यक्रमांच्या नांदीतून संमेलनाचा पारंपरिक चेहरा बदलण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. डोंबिवली येथे दि. ३ ते ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या साहित्य संमेलनाची कार्यक्रमपत्रिका साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी रविवारी जाहीर केली. या वेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी उपस्थित होते.दि. ३ फेब्रुवारीला साहित्य संमेलनाला दरवर्षीप्रमाणे सकाळी ग्रंथदिंडीने प्रारंभ होणार आहे. मावळते अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन होईल. त्यानंतर संमेलनाचा उद्घाटन सोहळा दुपारी ४ वाजता रंगेल. रात्री सुखदेव ढाणके यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कविसंमेलन होणार असून, अशोक बागवे, अनुपमा उजागरे, इंद्रजित घुले, संजीवनी बोकील आदी मान्यवर सहभागी होतील. शनिवार दि. ४ फेब्रुवारी रोजी अध्यक्षीय भाषणावर चर्चा हा कार्यक्रम होणार असून, विजय चोरमारे, डॉ. रामचंद्र काळुंखे, भानू काळे, प्रदीप दाते सहभागी होतील. यादिवशी चार परिसंवाद रंगणार आहेत. अनिल बोकील यांच्या अध्यक्षतेखाली ‘बदलती अर्थव्यवस्था, समाजाचे विघटन व मराठी लेखन’ या परिसंवादात डॉ. जगदीश कदम, डॉ. श्रीकांत बाराहाते, यमाजी मालकर, चंद्रशेखर टिळक भाग घेतील. ‘ग्रामीण स्त्री : वास्तवातील आणि साहित्यातील’ हा परिसंवाद डॉ. मधुकर वाकोडे यांच्या अध्यक्षतेखाली होईल. तर माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली ‘पुरोगामी महाराष्ट्र आणि वाढती असहिष्णुता’ हा परिसंवाद होईल. बालकुमारांसाठी स्वतंत्र बालकुमार मेळावा रंगणार असून, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन होईल. रंगणार बोलीतील कथाकथन : परिसंवादासह मुलाखतींचा नजराणा यंदा ’टॉक शो’ हा कार्यक्रम संमेलनात प्रथमच होणार असून, ‘साहित्य व्यवहार आणि माध्यमांचे उत्तरदायित्व’ या विषयांतर्गत प्रा. रा. रं. बोराडे, संजय आवटे, प्रकाश एदलाबादकर, मल्हार अरणकल्ले, अरुण म्हात्रे, डॉ. उदय निरगुडकर सहभागी होतील. तसेच ‘कवी, कविता आणि काव्यानुभव’ हा वेगळा कार्यक्रम प्रभा गणोरकर, अशोक नायगावकर, संदीप खरे, श्रीकांत देशमुख यांच्या उपस्थितीत रंगेल.  नवोदित लेखक मेळावा, पाच नव्या कवींचे काव्यवाचन, युवा प्रतिभेला स्वतंत्र व्यासपीठ देणारा ‘शोध : युवा प्रतिभेचा’, विचार जागर आणि स्थानिक बहुभाषिकांचे आयोजन असलेला ‘आंतर-भारती’ आदी कार्यक्रमांची पर्वणी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.  रविवार दि. ५ फेब्रुवारी रोजी ‘आम्हीच मराठीचे मारेकरी’ हा परिसंवाद डॉ. सुधीर रसाळांच्या अध्यक्षतेखाली रंगणार आहे. यात ज्ञानेश महाराव, दीपक पवार, बाळ फोंडके, अ‍ॅड. शांताराम दातार, प्रा. आनंद मेणसे, डॉ. रमेश जाधव, डॉ.कमलाकर कांबळे, कृष्णाजी कुळकर्णी विचार व्यक्त करतील.  कविसंंमेलन, ‘मराठी समीक्षेची समीक्षा’ या परिसंवादाबरोबरच मेधा पाटकर, सई परांजपे आणि सुधा मूर्ती या तीन प्रतिभावंतांच्या चर्चा आणि गप्पांवर आधारित ‘प्रतिभायन’ हा कार्यक्रम रंगणार आहे.  बोलींवरील भर हे या संमेलनाचे वैशिष्ट्य असून, बोलीतील कथाकथनात सुनील गायकवाड ( अहिराणी), सुमिता कोंडबत्तुनवार (झाडीबोली), राम निकम (मराठवाडी), बाबा परीट (कोल्हापुरी), भास्कर बडे (मिश्र), प्रसाद कांबळी (मालवणी) यांचा समावेश आहे. कांचन व कमलाकर सोनटक्के यांच्या मुलाखतीचा कार्यक्रमदेखील होणार आहे.