शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

विश्वास नांगरे-पाटील, दत्तात्रय शिंदे यांची बदली करणार : दीपक केसरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 19:24 IST

सांगली पोलिसांनी केलेला प्रकार खूपच लाजिरवाणा आहे. त्याचे कोणीही समर्थन करणार नाही. याप्रकरणी परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील व सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे या दोघांच्या बदलीची मागणी होत आहे. त्या संदर्भातील निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून घेतला जाई

ठळक मुद्देसांगली पोलिसांचा प्रकार लाजिरवाणा मृत अनिकेतच्या कुटुंबियांना मदतीसाठी प्रयत्नराज्यात सर्व पोलीस ठाण्यांत सीसीटीव्ही ‘डेथ इन कस्टडी’मध्येही महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर

कोल्हापूर : सांगली पोलिसांनी केलेला प्रकार खूपच लाजिरवाणा आहे. त्याचे कोणीही समर्थन करणार नाही. याप्रकरणी परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील व सांगलीचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे या दोघांच्या बदलीची मागणी होत आहे. त्या संदर्भातील निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून घेतला जाईल. मृत अनिकेतच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. रविवारी अंबाबाई दर्शनासाठी आल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.सांगली शहर पोलिसांनी अनिकेत कोथळे या संशयित आरोपीचा खून करून मृतदेह जाळल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. या घटनेने राज्यात खळबळ उडाली आहे. गृहराज्यमंत्री केसरकर रविवारी सांगलीला जाण्यापूर्वी कोल्हापुरात काही काळ थांबले होते. अंबाबाई मंदिरात दर्शन घेऊन आल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

अनिकेत हत्या प्रकरणानंतर विशेष पोलीस महानिरीक्षक नांगरे-पाटील व पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे या दोघांच्या बदलीची मागणी शिवसेना व इतर पक्ष व संघटनांनी केली आहे. यासंबंधी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून त्यांच्या बदलीचा निर्णय घेतला जाईल. सातारा, सांगली आणि कोल्हापुरात आरोपींना थर्ड डिग्रीचा जास्त वापर केला जातो. तसेच ‘डेथ इन कस्टडी’मध्येही महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.

पोलीस कोठडीत आरोपींना दिल्या जाणाऱ्या वागणुकीविषयी नियमावली ठरवण्याबरोबरच अधिकाऱ्यांनाही योग्य प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. मृत अनिकेतच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी आपला प्रयत्न राहील. या गुन्ह्याचा तपास पूर्ण करून खटला जलदगती न्यायालयात चालवण्यासाठी आवश्यक मदत केली जाईल.राज्यात सर्व पोलीस ठाण्यांत सीसीटीव्हीवित्त आणि नियोजन खात्याने जिल्हा नियोजन समितीतून सीसीटीव्ही खरेदीला नुकतीच परवानगी दिली आहे. त्यामुळे वर्षभरात राज्यातील सर्वच पोलीस ठाण्यांत सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. पोलिसांच्या कामावर नियंत्रण राहणार असून, कोठडीत संशयित आरोपींना कशी वागणूक दिली जाते, याची माहिती हाती पडणार आहे.

 

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Sangliसांगली