शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
3
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
4
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
5
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
6
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
7
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
8
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
9
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
10
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
11
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
12
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
13
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
14
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
15
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
16
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
17
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
18
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
19
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
20
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश

ट्रकने चिरडला संसार

By admin | Updated: June 5, 2014 01:10 IST

दारूच्या नशेत भरधाव ट्रक चालवून एका ट्रकचालकाने जुडीबुटी विकणार्‍याचा संसार चिरडला. दाम्पत्य ठार झाले. तर, त्यांची चिमुकली गंभीर जखमी आहे. या अपघातात जुडीबुटीवाल्यांची छोटी बस,

जडीबुटी विकणारे दाम्पत्य ठार : चिमुकली गंभीर, वाहनाचीही मोडतोडनागपूर : दारूच्या नशेत भरधाव ट्रक चालवून एका ट्रकचालकाने जुडीबुटी विकणार्‍याचा संसार चिरडला. दाम्पत्य ठार झाले. तर, त्यांची चिमुकली  गंभीर जखमी आहे. या अपघातात जुडीबुटीवाल्यांची छोटी बस, व्हॅन आणि एका मोटरसायकलचीही मोडतोड केली. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या  हद्दीत मंगळवारी रात्री ११ वाजता हा भीषण अपघात घडला.उत्तर प्रदेशातील अनेक वैदू ठिकठिकाणी जडीबुटीची दुकाने लावतात. नाडी परीक्षण करून औषधे देणारी ही मंडळी पोटापाण्यासाठी रस्त्याच्या  कडेला दुकाने लावतात आणि त्यातच आपला संसारही थाटतात. बांदा (यूपी) जिल्ह्यातील बदोसा (अतरसा) येथील कपूरसिंग भूरसिंग चितोडिया  (वय ६५) यानेसुद्धा काही दिवसांपूर्वी कामठी मार्गावरील जायका मोटर्ससमोर, ट्रान्सपोर्ट प्लाझाच्या भिंतीला लागून आपले दुकान थाटले होते.   कपड्याच्या तंबूतील दुकानातच त्याचा संसारही होता. कपूरसिंगची मुलगी पिंकी (वय २0), जावई सुनील कमलेश चितोडिया (वय २३) आणि पिंकीची मुलगी मुस्कान (वय दीड वर्ष) तेथेच राहात होते.  मंगळवारी रात्री जेवण केल्यानंतर सुनील आणि पिंकी चिमुकल्या मुस्कानला घेऊन तंबूतच झोपले. तर, कपूरसिंग बाहेर झोपण्याच्या तयारीत असताना  भरधाव ट्रक (एमएच ४0/ वाय ८३६१) तंबूत शिरला. त्यामुळे सुनील, पिंकी आणि चिमुकली मुस्कान चिरडली गेली.सुनील आणि पिंकीचा मृत्यू झाला. मुस्कान गंभीर जखमी आहे. ट्रकचालक एवढय़ा निष्काळजीपणे आणि भरधाव वाहन चालवत होता की त्याने दोन  बळी घेतानाच कपूरसिंगची टेम्पो ट्रॅव्हल्स (एमएच २0/ई ८0३७) मारुती व्हॅन एमएच 0२/जे १४२९) आणि हिरो होंडा मोटरसायकल (एमएच  ३१/एयू ७४२७) या वाहनांचीही मोडतोड केली. अपघातानंतर आरोपी ट्रकचालक पळून गेला. यशोधरानगर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. त्याचा  शोध घेतला जात आहे. (प्रतिनिधी)कसे होणार मुस्कानचे ?ट्रकचालकाने कपूरसिंगचा भरलापुरला संसार चिरडला. त्याच्या उदरनिर्वाहाची साधनेही निकामी केली. मुलगी आणि जावई ठार झाले. तर चिमुकली  मुस्कान गंभीर जखमी आहे. वृद्ध कपूरसिंगला या घटनेमुळे प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. चिमुकल्या मुस्कानचा औषधोपचार कसा करावा, पुढे  तिचे पालनपोषण कसे करावे, असा प्रश्न त्याचे दु:ख अधिकच तीव्र करीत आहे.