ट्रकने शाळकरी विद्यार्थ्याला चिरडले

By admin | Published: November 21, 2014 12:50 AM2014-11-21T00:50:09+5:302014-11-21T00:50:09+5:30

अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, अपघाताला कारणीभूत असलेला मेहता काटा तातडीने हटविण्यात यावा तसेच या भागातील वाहतूक नियंत्रित करावी,

The truck crashed into a schoolboy student | ट्रकने शाळकरी विद्यार्थ्याला चिरडले

ट्रकने शाळकरी विद्यार्थ्याला चिरडले

Next

बहीण गंभीर जखमी : कळमन्यात शिवसेनेचे आंदोलन; रास्ता रोको, प्रचंड तणाव
नागपूर : अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, अपघाताला कारणीभूत असलेला मेहता काटा तातडीने हटविण्यात यावा तसेच या भागातील वाहतूक नियंत्रित करावी, आदी मागण्या करून आज सकाळी शिवसेनेने कळमन्यात जोरदार आंदोलन केले. आंदोलनामुळे मिनीमातानगरातील वाहतूक बंद पडली. दगडफेकीमुळे तणाव निर्माण झाला. स्फोटक स्थिती निर्माण झाली असताना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलकांची समजूत काढून त्यांना कसेबसे शांत केले.
कळमन्यातील सावरकरनगर लेआऊट (विजयनगर) मधील तुषार अशोक शाहू (वय ८) आणि त्याची बहीण रविना अशोक शाहू (वय १३) हे मिनीमातानगरातील राजीव उच्च प्राथमिक शाळेत शिकतात. बुधवारी सायंकाळी ५.३० वाजता सायकलने परत घरी येत असताना मेहता काट्याजवळ त्यांना एका भरधाव ट्रकने धडक दिली. त्यामुळे तुषारचा करुण अंत झाला तर रविना गंभीर जखमी झाली. तिला मेयोत दाखल करण्यात आले. या अपघातानंतर घटनास्थळी प्रचंड तणाव निर्माण झाला.
या मार्गावर टपरीवाल्यांचे अतिक्रमण आहे. अपघातस्थळाजवळ मेहता काटा आहे. तेथे जड वाहनांची नेहमी वर्दळ असते. मोठ्या प्रमाणात वाहने उभी असतात. तो काटा तेथून बंद करावा आणि तेथील टपरीवाल्यांना हुसकावून लावण्याची वारंवार मागणी करूनही पोलीस, महापालिकेकडून कारवाई केली जात नाही. त्यामुळे या परिसरात नेहमीच अपघात होतात. बुधवारीसुद्धा असाच अपघात घडला आणि तुषारचा नाहक बळी गेला. यामुळे नागरिकांच्या भावना तीव्र झाल्या. या पार्श्वभूमीवर आज सकाळपासूनच अपघातस्थळी शिवसैनिकांनी घोषणाबाजी करून अतिक्रमण करणाऱ्या टपरीवाल्यांना, वाहतूकीत अडसर निर्माण करणाऱ्या वाहनधारकांना हुसकावणे सुरू केले. सकाळी ८ पासून आंदोलनाला सुरुवात झाली.
शिवसेनेचे जिल्हाप्रमूख सतीश हरडे यांच्या नेतृत्वात शहर उपप्रमुख टिंकूसिंह दिगवा, नगरसेवक जगतराम सिन्हा, रवनिश पांडे, चिंटू महाराज, संदीप पटेल यांच्यासह ५०० वर शिवसैनिकांनी हा मार्ग रोखून धरला. आंदोलनात मृत तुषारचे नातेवाईक, या भागातील नागरिक, शाळांमधील विद्यार्थी तसेच त्यांचे पालकही मोठ्या संख्येत सहभागी झाले होते. त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली. मृत तुषारच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, जीवघेण्या अपघाताला कारणीभूत असलेला मेहता काटा तातडीने हटवावा तसेच या भागातील वाहतूक नियंत्रित करावी, या मागण्या लावून धरल्या. (प्रतिनिधी)
वातावरण चिघळले
सकाळी ८ पासून सुरू झालेले आंदोलन १०.३० पर्यंत सुरू होते. कुणीच वरिष्ठ घटनास्थळी न पोहचल्यामुळे संतप्त झालेल्या काहींनी धरम काट्यावर दगडफेक केली. त्यामुळे वातावरण चिघळले. स्फोटक स्थिती निर्माण झाली असतानाच वाहतूक शाखेचे उपायुक्त भरत तांगडे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांशी चर्चा करून मागण्या समजून घेतल्या. त्या पूर्ण करण्यासाठी संबंधितांसोबत चर्चा करावी लागेल, असे सांगून सोमवारपर्यंत वेळ मागितला. अपघात रोखण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाय करण्याचेही आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन थांबविण्यात आले.
शाळेत अन् परिसरातही शोककळा
मृत तुषारचा परिवार गरीब आहे. त्याचे वडील अशोक शाहू ड्रायव्हिंग करतात. आई लक्ष्मीबाई घरकाम करते. त्याला रविना नामक बहीण आणि करण नामक भाऊ आहे. तो सर्वात लहान होता. राजीव गांधी स्कूलमध्ये तुषार दुसरीत शिकत होता. भीषण अपघातात त्याचा मृत्यू झाल्याचे कळल्यामुळे शाळेतच नव्हे तर परिसरातही तीव्र शोककळा पसरली. शिक्षक, विद्यार्थी अन् पालकांनी आज शाळेत जाण्याऐवजी आंदोलनस्थळ गाठून आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या.

Web Title: The truck crashed into a schoolboy student

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.