शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मराठा मोर्चातून परतताना तिहेरी अपघात; 4 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 14:00 IST

येवला -औरंगाबाद रोडवर तिहेरी अपघात झाल्याची माहिती मिळते आहे

ठळक मुद्देयेवला -औरंगाबाद रोडवर तिहेरी अपघात झाल्याची माहिती मिळते आहेनांदगांव फाट्याजवळ ट्रक आणि दोन कारची धडक झाली असून यामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे.

औरंगाबाद, दि. 10- औरंगाबाद रोडवर तिहेरी अपघात झाल्याची माहिती मिळते आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे. तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत.  या पाचपैकी तीन जणांची प्रकृती चिंताजनक असून यामधील दोघांवर औरंगाबाद हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत तर एका जखमीवर येवल्यामधील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. तर दोन जखमींवर वैजापूर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे.  हर्षल अनिल घोलप (वय, २८, रा. गावठाण, रुकडी पुणे), नारायण कृष्‍णा थोरात (वय, २१, रा. गाजगाव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), अविनाश नवनाथ गव्हाणे अशी मृतांची नावं आहेत. तर गौरव प्रजापती(२२) आणि ओमेश भगत (२०) अशी जखमींची नवे आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

नांदगांव फाट्याजवळ ट्रक आणि दोन कारची धडक झाली असून यामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे. मुंबईतील मराठा क्रांती मोर्चातून घरी परतत असताना हा अपघात झाल्याचं समजलं आहे. गुरूवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. वैजापुर तालुक्यातील नांदगांव फाट्याजवळ हा अपघात घडला.. मृत्यू झालेल्या चार जणांमध्ये एका बारा वर्षाच्या मुलाचाही समावेश असल्याचं समजतं आहे.

मुंबईतही बुधवारी घडली दुर्घटना 

वडाळ्यातील भक्ती पार्क येथील मोनो रेल बस स्टॉपजवळ बाईक पार्क करून रस्त्याच्या दुभाजकावर बसलेल्या तीन जणांना भरधाव ट्रकनं उडवलं. या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला असून, एक जण गंभीररीत्या जखमी आहे. 23 वर्षीय विनायक भास्कर ढगे, 25 वर्षीय सिद्धेश मासे यांचा मृत्यू झाला आहे. तर 22 वर्षीय सिद्धेश सुरेश चव्हाण गंभीररीत्या जखमी आहे. ट्रक चालकाविरोधात वडाळा टीटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, 45 वर्षीय ट्रक चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईतील वडाला भागातील भक्ती पार्क सर्कलजवळ ट्रकने तीन बाईकना धडक दिली. बुधवारी (9 ऑगस्ट) संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारस ही घटना घडली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे, तर एक जण गंभीर जखमी आहे. सायन हॉस्पिटलमध्ये जखमीला उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे.