शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
4
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
5
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
6
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
7
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
8
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
9
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
10
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
11
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
12
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
13
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
14
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
15
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
16
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
17
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
18
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
19
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
20
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच

त्र्यंबकेश्वर झळाळले!

By admin | Updated: September 26, 2015 02:52 IST

सिंहस्थ कुंभमेळ्यातील अखेरच्या व तृतीय शाहीपर्वणीत शुक्रवारी त्र्यंबकेश्वरमध्ये दहाही आखाड्यांतील शैवपंथीय साधू-महंतांनी शाही थाटात मिरवणुकीने येत कुशावर्तात स्नान केले.

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यातील अखेरच्या व तृतीय शाहीपर्वणीत शुक्रवारी त्र्यंबकेश्वरमध्ये दहाही आखाड्यांतील शैवपंथीय साधू-महंतांनी शाही थाटात मिरवणुकीने येत कुशावर्तात स्नान केले. महिनाभरापासून अखंडपणे सुरू असलेल्या मंगलमय कुंभपर्वाची समाप्ती होत असतानाच लाखो भाविक कुशावर्तात स्नान करत त्र्यंबकराजाच्या चरणी नतमस्तक झाले.त्र्यंबकेश्वर गाठण्यासाठी भाविकांना सुमारे २० कि.मी. पायपीट करावी लागल्याने पहिल्या पर्वणीचीच पुनरावृत्ती झाल्याने एसटी महामंडळासह प्रशासनाला भाविकांच्या उद्रेकाला सामोरे जावे लागले. गुरुवारी रात्री साडेबारा वाजता आॅब्जर्व्हर रिसर्च फाउंडेशन, महाराष्ट्र सरकार आणि चीन दूतावास यांच्या संयुक्त विद्यमाने ‘होली वॉटर डिप्लोमसी’ अर्थात राजकीय संस्कृती मिलाफाच्या दृष्टीने मानसरोवरातील पवित्र जल त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्तात तर कुशावर्तातील पवित्र जल मानसरोवरात नेण्याचा उपक्रम पार पडला.त्र्यंबकेश्वर येथील पुरोहितांच्या उपस्थितीत विधिवत पूजेसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुशावर्तात जल टाकले. सुधींद्र कुलकर्णी, अंजली भागवत, डॉ. विजय भटकर, पालकमंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री दादा भुसे,आ. बाळासाहेब सानप यांच्यासह चिनी दूतावासातील वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते. (प्रतिनिधी)गुजरातच्या मुख्यमंत्र्यांकडून गोदापूजनगुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी शुक्रवारी रामकुंडावर गोदावरी मातेचे अभिषेक व पूजन करुन पवित्र स्नान केले. त्यापूर्वी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी गोदापूजन केले. कैलास मानसरोवरातील जल व गोदावरीच्या पवित्र जलाचा संगम हा दोन संस्कृतीचा आणि आस्थांचा संगम आहे. त्यामुळे सिंहस्थ कुंभमेळा विशेष स्मरणीय राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.----शाही मिरवणुकीत महिला महंत व महामंडलेश्वरांचा सहभागही लक्षणीय होता. अपूर्वानंद माताजी, माता सुनीतानंदगिरीजी आपल्या शेकडो भक्तांसह मिरवणुकीत सहभागी झाल्या होत्या.पंचायती महानिर्वाणी आखाड्याच्या मिरवणुकीत जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील स्वामी कृष्णचैतन्य पुरीजी महाराज यांचा खालसा सहभागी झाला होता. बीड जिल्ह्यातीलही एक खालसा या मिरवणुकीत होता. या दोन्ही मराठी खालशांनी भाविकांचे लक्ष वेधून घेतले.अंगावर चार किलोपेक्षा अधिकचे सुवर्ण दागिने मिरवणाऱ्या गोल्डनबाबांना मिरवणुकीत सर्वाधिक प्रतिसाद मिळत होता. -------पहिल्या दोन पर्वण्यांच्या दरम्यान साधू-महंतांसह नागरिकांच्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेले परमहंस नित्यानंद महाराज शुक्रवारी (२५) च्या तिसऱ्या व अंतिम स्नानासाठी हजर नसल्याने अनेकांचा हिरमोड झाला.