मुंबई : घुमान येथे होणा:या 88व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. भारत सासणो यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पंजाबच्या घुमान येथील संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. सदानंद मोरे व डॉ. अशोक कामत हेही रिंगणात आहेत.
ज्येष्ठ कवी प्रा. शंकर वैद्य यांनी डॉ. भारत सासणो यांचे नाव सुचविले असून, या अर्जावर अशोक कोठावळे, मोनिका गजेंद्रगडकर, प्रदीप कर्णिक, चंद्रकांत भोंजाळ आणि अशोक मुळे यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली आहे. तर, संत नामदेवांच्या कर्मभूमीत होणा:या या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. अशोक कामत यांनी कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत यापूर्वीच उमेदवारी जाहीर केली आहे.
डॉ. सदानंद मोरे यांच्यासाठी अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेणारे ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी मोरे यांचे नाव सुचविले आहे.
या अर्जावर पद्मगंधा प्रकाशनचे अरुण जाखडे, कवी उद्धव कानडे, सासवड येथील आचार्य अत्रे प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय कोलते, साहित्य परिषदेच्या सातारा शाखेचे अध्यक्ष शिरीष चिटणीस आणि निकिता मोघे यांनी अनुमोदक म्हणून सही केली आहे. आता एकंदरीत, संमेलनाध्यक्षपदासाठी तिरंगी लढत होणार असून, त्याबाबत साहित्य वतरुळात चर्चा रंगेल.(प्रतिनिधी)
अर्ज करण्याची मुदत 23 सप्टेंबर.
अर्ज मागे घेण्याची मुदत 3क् सप्टेंबर.
मतदानाची मुदत 9 ऑक्टो.ते 9 डिसें.
मतमोजणी व निकाल 1क् डिसेंबर.