शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी महिलेचे क्रांतिकारी पाऊल, मोडली मतदान बहिष्काराची परंपरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2019 19:08 IST

कैनाड गृप ग्रामपंचायतीचे विभाजन करुन कोसबाड गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात यावी ही अनेकवर्षांपूर्वीची मागणी आहे. मात्र ती मान्य होत नसल्याच्या निषेधार्थ येथील मतदारांकडून आतापर्यंतच्या निवडणुकांवर सातत्याने बहीष्कार टाकण्यात येत होता.

- अनिरुद्ध पाटील 

डहाणू/बोर्डी  -  डहाणू विधानसभा मतदारसंघातील कैनाड गृप ग्रामपंचायतीचे विभाजन करुन  कोसबाड गावाची स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात यावी ही अनेकवर्षांपूर्वीची मागणी आहे. मात्र ती मान्य होत नसल्याच्या निषेधार्थ येथील मतदारांकडून आतापर्यंतच्या निवडणुकांवर सातत्याने बहीष्कार टाकला आहे. दरम्यान ही परंपरा कैनाड येथील चंदा विक्रम घोरखाना य़ा महीलेने सोमवार, 29 एप्रिल रोजी मतदानाचा हक्क बजावून मोडीत काढली.    सतराव्या लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या दिवशी कोसबाड गावाने पुर्णपणे निवडणुकीवर बहीष्कार टाकला होता. या आदिवासी बहुल गावात सुमारे पाचहजार मतदार आहेत. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कोसबाड बुथवर  मतदान यंत्राचे एकही बटन दाबले गेले नव्हते. त्यामुळे यावेळीही निवडणूक कर्मचाऱ्यांना रिकाम्या यंत्राने माघारी फिरण्याची वेळ येणार होती. मात्र अचानक चंदा विक्रम घोरखाना या महीलेचे पाऊल मतदान केंद्राच्या आवारात पडताच सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यानंतर तेथे तैनात निवडणूक कर्मचाऱ्यांची नजर तिच्या प्रत्येक हालचालींवर खिळली गेली. पुढे काय घडणार यामुळे सर्वांच्या छातीत धडधड सुरू असताना,  तिने उंबरठा ओलांडून मतदान केंद्रात प्रवेश करून मतदानाकरिता आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यावर काही सेकंदातच मतदान झाल्याचा आवाज आला आणि  त्यासह या केंद्रात एका मतदानाची नोंद झाली. अनेक वर्षांपासून निवडणुकीवर बहीष्काराची परंपरा त्यासह मोडीत काढत चंदाने विक्रम साधला.  एखाद्या महिला प्रधान चित्रपटाला शोभावी अशी ही कथा प्रत्यक्षात घडली असून त्या तरुण आदिवासी महिलेचे सर्वचस्तरातून कौतुक होत आहे. या केंद्रावर नियुक्त कर्मचाऱ्यांचाही हा एक प्रकारचा विजय आहे. मात्र यापुढे सत्तेवर येणाऱ्या शासनाची खरी कसोटी असून चंदाने लोकशाहीवर दाखवलेला विश्वास दृढ करण्यासाठी या आदिवासी नागरिकांच्या प्रश्नांवर प्राधान्याने विचार व्हायला हवा. अन्यथा गावाचा विरोध पत्करून तिने घेतला हा निर्णय मातीमोल ठरेल.दरम्यान ग्रामपंचायत निवडणुकीचा अपवाद वगळता मागील लोकसभा,विधानसभा,जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकीत मतदानावरील बहिष्कार कायम होता. यावेळीही तो कायम राहिला असला, तरी चंदा विक्रम गोरखना या महीलेने मतदान केल्याने हा अपवाद ठरला आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकpalghar-pcपालघरMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Votingमतदान