शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘वनवासी’ला आदिवासींचा नाशिकमध्ये आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 06:35 IST

नाशिकमध्ये नोंदविला विरोध : संघाच्या कल्याण आश्रम संकल्पनेला छेद

- संजय पाठक

नाशिक : देशातील मूळ रहिवासी असलेल्यांना ‘वनवासी’ संबोधून सेवा कार्य करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित वनवासी कल्याण आश्रमाच्या संकल्पनेला आता काही आदिवासींकडूनच आक्षेप घेतला जात आहे.

वनवासी कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते दिंडोरी तालुक्यात मुलांना खाऊ वाटण्यासाठी जात असताना त्यांची गाडी आदिवासी युवक कार्यकर्त्यांनी कोशिंबे येथे अडवली आणि वनवासी शब्दावरून आक्षेप नोंदवला. बिरसा मुंडा किंवा तत्सम आदिवासी क्रांतिकारकांची नावे का वापरत नाही, असा जाब विचारला आणि गाडीवरील वनवासी हे नाव खोडून टाकले. याप्रकरणी आश्रमाने लखन पवार याच्यासह अन्य कार्यकर्त्यांविरुद्ध वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

वनवासी नाव खोडत असल्याचा एक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला. शासनाच्या टीआरटीआयचे अशासकीय सदस्य प्रा. अशोक बागुल यांनी वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून काम करणाºया एका वैद्यकीय व्यावसायिकाला दूरध्वनी करून वनवासी शब्द तसेच आदिवासींच्या निसर्ग देवतेपलीकडे अन्य देवांच्या सुरू असलेल्या प्रसाराविषयी आक्षेप नोंदवला आहे.

वनवासी कल्याण संस्थेचे काम वाढल्याने त्याची पुनर्रचना करण्यात येत असून पुणे, नाशिक, सातारा, सांगली या जिल्ह्यांचा समावेश असलेल्या पश्चिम महाराष्ट्र कार्यक्षेत्रासाठी वनवासी कल्याण आश्रम नाव बदलून जनजमाती कल्याण आश्रम करण्यात येणार आहे. धुळे - नंदुरबार क्षेत्राचा समावेश असलेल्या देवगिरी प्रांतासाठी देवगिरी कल्याण आश्रम असे नाव धर्मदाय आयुक्तांकडे नोंदविण्यात येणार आहे. आश्रमाला वनवासी नावात स्वारस्य नाही तर सेवा प्रकल्पात असल्याचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सचिव शरद शेळके यांनी सांगितले.१९५२ पासून कामआदिवासींच्या क्षेत्रात १९५२ पासून संघाची वनवासी कल्याण आश्रम शाखा काम करते. महाराष्ट्रात १९७८ पासून या पद्धतीचे काम करण्यात येते. विदर्भासह अनेक भागात वनवासी या शब्दाला विरोध केला जात असतानाच नाशिकमध्ये मात्र त्याला कृतिशील विरोधही होऊ लागला आहे.

शहरात राहणारे शहरवासी तसेच वनात राहणारे म्हणून वनवासी असा शब्द वापरला जातो. तथापि, गैरसमज पसरविले जात असतील तर ते दूर करण्यासाठी आश्रम कधीही तयार आहे.- शरद शेळके, प्रांत सचिव, पश्चिम महाराष्ट्र प्रांतमूळ निवासींसाठी आदिवासीशब्द रूढ असताना वनवासी शब्द रूजवणे चुकीचे आहे. गिरीवासी, वनबंधूया शब्दांतून वेगळेच आशय निर्माण होतात. कामाला विरोध नाही तर शब्दाला आक्षेप आहे. मी यापूर्वीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात पत्र पाठवून आमच्या भावना कळविल्या आहेत.- प्रा. अशोक बागुल, आदिवासी बचाव समिती

टॅग्स :Nashikनाशिक