शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी विकास विभाग घोटाळा : उच्च न्यायालयाने सहसचिवांना घेतले फैलावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 06:08 IST

आदिवासी विकास विभागाच्या ६,००० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदविण्याचे उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही, आदिवासी विभागाचे सहसचिव आरोपींना सुनावणी देण्यास इच्छुक आहेत.

मुंबई : आदिवासी विकास विभागाच्या ६,००० कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे नोंदविण्याचे उच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश असतानाही, आदिवासी विभागाचे सहसचिव आरोपींना सुनावणी देण्यास इच्छुक आहेत. तशी भूमिका त्यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट केली आहे. आदेशाविरुद्ध सहसचिव सुनिल पाटील यांनी भूमिका घेतल्याने न्यायालयाने त्यांना सुनावले. आरोपींना पाठीशी घालत असल्याने तुमच्यावरच गुन्हा का नोंदविण्यात येऊ नये, असा सवाल न्यायालयाने पाटील यांना मंगळवारी केला. तसेच प्रतिज्ञापत्र मागे घेण्याचे आदेश देत आरोपींवर काय कारवाई केली, याची माहिती देण्याचे निर्देश दिले.विजय गावीत आदिवासी विकास विभागाचे मंत्री असताना, आदिवासी विभाग वस्तू वाटपात सुमारे ६,००० कोटींचा घोटाळा झाला. या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. राजेंद्र रघुवंशी, रत्नेश दुबे यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. न्यायालयाने चौकशी करण्यासाठी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एम.जी. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. तिने फेब्रुवारी २०१७ मध्ये न्यायालयात अहवाल सादर केला. घोटाळ्यात तत्कालीन मंत्री विजय गावीत व विभागातील कर्मचाºयांची भूमिकेबाबत सखोल माहिती दिली. तसेच संबंधित अधिकाºयांवर गुन्हा नोंदविण्याची शिफारसही केली. कारवाईचा बडगा उगारला जाईल, या भीतीने संबंधित अधिकाºयांनी आपल्यावर थेट गुन्हा न नोंदविता, नैसर्गिक न्यायदान तत्त्वाप्रमाणे आधी सुनावणी घ्यावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने १४ जूनला ती फेटाळत अधिकाºयांवर थेट गुन्हे नोंदविण्याचे तसेच याबाबत माहिती देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले.न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे मंगळवारच्या सुनावणीत आदिवासी विकास विभागाचे सहसचिव हजर होते. आतापर्यंत किती आरोपींवर गुन्हा नोंदविला, असा सवाल न्यायालयाने करताच, मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी तीन जणांवर गुन्हा नोंदविल्याची माहिती दिली. या प्रकरणात ११० हून अधिक आरोपींचा समावेश असताना, दीड वर्षात केवळ तिघांवरच गुन्हा नोंदविलात? असे संतापत न्यायालयाने म्हटले. त्यावर यादव यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले. ते वाचून न्यायालय वैतागले. आरोपींना सुनावणी न देण्याचे आदेश असतानाही (सुनिल पाटील) त्यांना सुनावणी का देताय? हा आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न आहे. याबद्दल तुमच्यावरच गुन्हा का नोंदवू नये? हा न्यायालयाचा अवमान आहे, असे म्हणत न्यायालयाने पाटील यांना प्रतिज्ञापत्र मागे घेण्यास सांगितले.दोन आठवड्यांनी नवे प्रतिज्ञापत्र सादर करा तसेच राज्य सरकारने किती जणांवर गुन्हा नोंदविला याची माहिती देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.

टॅग्स :Courtन्यायालयnewsबातम्या