- लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : आदिवासी भागामध्ये पावसाळ्यात सेवा देणाऱ्या डॉक्टरांना जादा वेतन आणि सोईसुविधा देण्याची कार्यवाही करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिले. पालघर, नंदुरबार व मेळघाट भागातील कुपोषण अधिक असलेल्या दुर्गम तालुक्यांमध्ये पावसाळ्यात होणारे कुपोषण रोखणे, साथीचे आजार तसेच बालमृत्यू रोखणे, रोजगाराची उपलब्धता करणे यासाठी संबंधित सर्व विभागांनी तातडीच्या उपाययोजनांची समन्वयाने व संवेदनशीलपणे अंमलबजावणी करावी. कुपोषित तसेच अती-कुपोषित बालकांना आरोग्य सुविधा आणि पोषण आहार तातडीने उपलब्ध होईल, यादृष्टीने काटेकोर नियोजन करण्यात यावे, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी या संबंधीच्या आढावा बैठकीत दिले. मुंबई परिसरात जादा असलेल्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिका पावसाळ्यात पालघर जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागात देता येऊ शकतील, असे यावेळी आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.
आदिवासी भागात डॉक्टरांना पावसाळ्यात जादा वेतन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2017 01:48 IST