शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
2
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
3
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
4
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
5
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
6
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
7
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
8
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
9
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
10
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
11
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
12
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
13
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
14
विरार-अलिबाग कॉरिडॉर सहा जोडण्यांद्वारे महानगरांना कनेक्ट करणार; ७५ हेक्टरवरील ५०४३ खारफुटी बाधित होणार
15
बापरे! प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला सोसायटीतील व्यक्तीकडून मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत
16
दोन वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या महाराष्ट्रातील आरोपीला फाशीच, राष्ट्रपतींनी फेटाळली याचिका
17
लोकलच्या फुटबोर्डावर उभे राहणे निष्काळजीपणा नव्हे, तर..; कोर्टानेच कान टोचले... आतातरी शहाणे व्हा!
18
ऑस्ट्रेलियात दहशतवादी हल्ला, १२ पर्यटक ठार, २९ जखमी; सिडनीतील बाँडी बीचवर बेछूट गोळीबार 
19
कोट्यवधी रुपयांची अफरातफर; भ्रष्टाचार केला म्हणून चीनच्या बँकरला मृत्युदंड
20
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष; सरकार आणि संघटनात्मक अनुभवाची दखल
Daily Top 2Weekly Top 5

कोपर्डी खटल्यात तीनही आरोपीं दोषी, बलात्कार आणि खुनाचा आरोप सिद्ध, शिक्षेबाबत मंगळवारी सुनावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2017 07:09 IST

संपूर्ण महाराष्ट्राला हादरविणा-या कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व खून प्रकरणाच्या खटल्यात शनिवारी जिल्हा न्यायालयाने तीनही आरोपींना दोषी धरले. त्यांच्याविरोधात बलात्कार, खून प्रकरणी आरोप सिद्ध झाले आहेत.

अहमदनगर : संपूर्ण महाराष्ट्राला हादरविणा-या कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार व खून प्रकरणाच्या खटल्यात शनिवारी जिल्हा न्यायालयाने तीनही आरोपींना दोषी धरले. त्यांच्याविरोधात बलात्कार, खून प्रकरणी आरोप सिद्ध झाले आहेत.दोषींच्या शिक्षेबाबत मंगळवार व बुधवारी सुनावणी होणार आहे. पप्पू ऊर्फ जितेंद्र बाबूलाल शिंदे (२५), संतोष गोरख भवाळ (३०) व नितीन गोपीनाथ भैलुमे (२६) या दोषींच्या गुन्ह्यासाठी जन्मठेप व फाशी या शिक्षेची तरतूद असल्याचे न्यायालयाने सुनावणीत सांगितले. जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी मुख्य आरोपी शिंदे याला कटकारस्थान, छेडछाड, अत्याचार, खून, बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली दोषी धरले. इतर दोघांना अत्याचार, खुनाच्या कटात सहभागी होणे व प्रोत्साहन देणे तसेच पॉक्सो कायद्याखाली दोषी धरले. आरोपींना दोषी ठरवण्यात यश आल्याबद्दल अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.दोषींच्या चेह-यावर काहीही भाव नाहीपप्पू शिंदे व नितीन भैलुमे हे कोपर्डीचे रहिवासी आहेत, तर संतोष भवाळ हा कर्जत तालुक्यातीलच खांडवी येथील आहे. त्यांना सकाळी साडेनऊ वाजताच बंदोबस्तात न्यायालयात आणण्यात आले. दोषी धरल्यानंतर ते स्तब्ध होते. त्यांच्या चेहºयावर काहीही भाव नव्हते.या कलमांखाली दोषीजितेंद्र शिंदे यास कटकारस्थान, अत्याचार करणे, खून करणे व छेडछाड करणे तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (पॉक्सो) कलम ६, ८ व १६ प्रमाणे दोषी धरले़ या कलमांसाठी जन्मठेप अथवा फाशीची तरतूद आहे़संतोष भवाळ व नितीन भैलुमे यांना मुलीची छेडछाड, अत्याचार व खुनाचे कटकारस्थान, गुन्ह्यासाठी प्रोत्साहन देणे (कलम १०९), तसेच पॉक्सो कायद्याखाली दोषी धरले आहे़अधिक शिक्षेसाठी होणार युक्तिवाददोषींच्या वकिलांचा युक्तिवाद झाल्यानंतर मंगळवारी सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अ‍ॅड़ उज्ज्वल निकम शिक्षेबाबत युक्तिवाद करतील. त्यानंतर त्याच दिवशी किंवा न्यायालयाने ठरविलेल्या पुढील तारखेला शिक्षा सुनावली जाईल. न्यायालयात शनिवारी मोठा पोलीस बंदोबस्त होता. कोपर्डीत गतवर्षी १३ जुलैला अल्पवयीन मुलीची बलात्कारानंतर हत्या झाली होती. एक वर्षे चार महिन्यांनंतर आरोपींना दोषी धरले गेले.पीडितेच्या आईला अश्रू अनावरपीडित मुलीची आई, वडील न्यायालयाच्या आवारात उपस्थित होते. तीनही आरोपींना दोषी धरल्यानंतर त्यांना व ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले. दोषींना फाशीच व्हायला हवी, अशी प्रतिक्रिया पीडितेच्या आईने दिली. सर्व समाज आमच्या पाठीशी उभा राहिला. तसेच उज्ज्वल निकम यांनी हा खटला यशस्वीपणे लढविला त्याबद्दल पीडितेच्या कुटुंबीयांनी आभार व्यक्त केले.निघाले होते मराठा क्रांती मूक मोर्चेकोपर्डीच्या संतापजनक घटनेनंतर आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी राज्यात लाखोंच्या संख्येने मराठा क्रांती मोर्चे निघाले होते. या महामोर्चांनी वर्षभर समाजमन ढवळून निघाले. शासनालाही या मोर्चांची दखल घ्यावी लागली.त्यांना जास्तीत जास्त शिक्षा मिळावीया निर्णयाने ‘त्या’ भगिनीला न्याय मिळाला. आपण ‘त्या’ भगिनीला परत आणू शकत नाही. नराधमांना शिक्षा मिळाल्याने पुन्हा असे कुणी करणाार नाही. दोषींना जास्तीत जास्त शिक्षा मिळावी, अशी अपेक्षा आहे.- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्रीविविध आठ कलमांन्वये न्यायालयाने आरोपींना दोषी ठरविले आहे. घटनेचा कोणीही प्रत्यक्ष साक्षीदार नव्हता. संपूर्ण खटला परिस्थितीजन्य पुराव्यांवर आधारित होता. परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळीच न्यायालयात सिद्ध करून दाखविली. - अ‍ॅड. उज्ज्वल निकम,विशेष सरकारी वकील

टॅग्स :Courtन्यायालय