शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

नक्षल्यांचा बिमोड करण्यासाठी ‘ट्राय जंक्शन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 02:36 IST

नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी महाराष्ट्र, छत्तीसगढ व मध्य प्रदेश ही तीनही राज्ये एकत्र येऊन ‘ट्राय जंक्शन’ (तिन्ही राज्यांच्या सीमांचा त्रिकोण) ही संयुक्त कारवाई करणार आहेत. मध्य प्रदेश व छत्तीसगढ या दोन्ही राज्यांना जोडण्यासाठी गोंदिया पोलिसांनी महाराष्ट्र शासनाकडे ३० किमी. रस्त्याच्या निर्मितीचा प्रस्ताव टाकला आहे.

नरेश रहिले गोंदिया : नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी महाराष्ट्र, छत्तीसगढ व मध्य प्रदेश ही तीनही राज्ये एकत्र येऊन ‘ट्राय जंक्शन’ (तिन्ही राज्यांच्या सीमांचा त्रिकोण) ही संयुक्त कारवाई करणार आहेत. मध्य प्रदेश व छत्तीसगढ या दोन्ही राज्यांना जोडण्यासाठी गोंदिया पोलिसांनी महाराष्ट्र शासनाकडे ३० किमी. रस्त्याच्या निर्मितीचा प्रस्ताव टाकला आहे.गोंदिया जिल्हा नक्षलवाद्यांचा रेस्ट झोन म्हणून ओळखला जात असला तरी जिल्ह्यात नक्षली कारवाया होतच असतात. नक्षलवाद्यांचा पाठलाग गोंदिया पोलिसांनी केला तर ते मध्य प्रदेश किंवा छत्तीसगढच्या सीमेत निघून जातात. जिल्ह्याच्या पिपरिया एओपी ते मध्य प्रदेश राज्यातील कट्टीपार हा परिसर ६० ते ७० किलोमीटरचा आहे. पिपरिया ते छत्तीसगढ राज्यातील कटेमा हा परिसर ८० ते ९० किलोमीटरच्या घरात असल्याने या परिसरात असलेल्या घनदाट जंगलाचा फायदा नक्षलवाद्यांना मिळतो. त्यामुळे या जंगल परिसरात असलेल्या पहाडीत कोणत्याही राज्याचे पोलीस पाहिजे त्या प्रमाणात कारवाई करू शकत नाहीत.‘ट्राय जंक्शन’ करण्याचा प्रयत्न असल्यामुळे महाराष्टÑाचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी ७ फेबु्रवारी रोजी गोंदिया जिल्ह्याच्या पिपरिया एओपीला भेट दिली.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी