शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मोडनिंबच्या तरुण मंडळाने वृक्ष संवर्धनासाठी बसविला वृक्ष गणपती

By admin | Updated: September 7, 2016 14:56 IST

सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंबमधील तरूणांनी चक्क लिंबाच्या झाडालाच गणपती बनविले आहे.

शिवाजी सुरवसे, ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. ७ -  मी देवळात नाही़, मी दगडात नाही़, मी झाडात आहे असा संदेश देत सोलापूर जिल्ह्यातील मोडनिंब (ता़ माढा) इथल्या पर्यावरण विषयक काम करणा-या तरुणांनी चक्क लिंबाच्या झाडालाच गणपती बनविले आहे. वृक्ष लागवडीचा आणि संवर्धनाचा संदेश देणारा हा इको फ्रेंडली गणपती उत्सुकतेचा आणि चर्चेचा विषय बनला आहे.
वृक्षवल्ली आम्हा सोयरी असे संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे त्याप्रमाणे झाडे झाडांमध्येच सर्व काही आहे हे दाखविण्याचा प्रयत्न या मंडळाने केला आहे.  मोडनिंब मधील रेल्वे स्टेशन रोडवर संगनबसवेश्वर मठाजवळ लष्कर ए शिवबा प्रतिष्ठान संचलित वीर मराठा गणेशोत्सव मंडळ ही गणेशाची मुर्ती बसविली आहे. गतवर्षी या मंडळाने बाबूंच्या कामठ्यांपासून बाहुबलीस्टाईलमध्ये दहा फुटाची गणपती मुर्ती बसविली होती़.  दरवर्षी काही तरी नवीन करणे आणि पर्यावरण जागृतीचे काम करणे हा उद्देश मंडळाने ठेवला आहे. 
संतोष लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली समाधान घाडगे, जगदीश डांगे, रणजित सुरवसे, किरण व्यवहारे, विजय परबत, धनाजी लादे, सोमनाथ माळी, शितल महाडीक, विजय बुरंडे, स्वाधीन थोरात यांच्या सहकाराने ही कल्पना मुर्त रुपात आल्याचे केदार यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले. 
 
एकच लक्ष्य दोन कोटी वृक्ष असा संदेश देत यंदाच्या वर्षी शासनाने वृक्षलागवड आणि संवर्धनासाठी विशेष लक्ष दिले. झाडे लावली तरचं आपले भविष्य चांगले आहे त्यामुळे आम्ही दरवर्षी पर्यावरण पूरक गणपती बसवितो़ लिंबाच्या झाडामध्ये सोंड दिसली त्याला आम्ही गणपती बनविले आणि ख-या अर्थाने हा उत्सुकतेचा गणपती बनला.
राहूल केदार, वीर मराठा गणेशोत्सव मंडळ, मोडनिंब