शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
3
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
4
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
6
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
7
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
8
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
9
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
10
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
11
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
12
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
13
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
14
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
15
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
16
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
17
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
18
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
19
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

चार वर्षांत राज्यातील जवळपास ३ कोटी रुग्णांवर उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 06:09 IST

१०८ रुग्णवाहिका ठरतेय वरदान : १० महिन्यांत सेवा घेण्यात पुणे आघाडीवर, आठ लाख गर्भवतींनाही झाला लाभ

- स्नेहा मोरे

मुंबई : राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना सेवा देणाऱ्या १०८ रुग्णवाहिकेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. २६ जानेवारी २०१४ रोजी ही सेवा राज्यात सुरू झाली, तेव्हापासून गेल्या चार वर्षांत तब्बल ३ कोटी ३९ लाख ५ हजार ८६३ रुग्णांवर या सेवेच्या माध्यमातून उपचार करण्यात आले आहेत. तर गेल्या जवळपास १० महिन्यांत या सेवेचा लाभ घेण्यात पुणे हे राज्यात प्रथम क्रमांकावर आहे.

राज्यभरात १०८ रुग्णवाहिकेची सेवा घेण्यात पुणे शहर आघाडीवर असून या जिल्ह्यात ३ लाख ४१ हजार २६३ रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यानंतर सोलापूर आणि मुंबई जिल्ह्यातील रुग्णांवर उपचार करण्याचे प्रमाण अधिक आहे. याशिवाय, गेल्या चार वर्षांत रुग्णवाहिकेने राज्यातील ८ लाख ३० हजार ४३५ गर्भवतींवर उपचार केले आहेत. तर याशिवाय, अन्य आरोग्यविषयक तक्रारींनी ग्रस्त असणाºया १६ लाख ३१ हजार ४८९ रुग्णांना नवसंजीवनी दिली आहे.

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान व आरोग्य विभाग यांच्या सहकार्याने ग्रामीण विशेषत: आदिवासीबहुल भागात आरोग्यविषयक सेवा-सुविधा जलदगतीने पोहोचाव्यात, या उद्देशाने ‘१०८’ रुग्णवाहिकेची संकल्पना मांडण्यात आली. या सेवेसाठी जिल्ह्यात ४६ रुग्णवाहिका कार्यरत आहेत. राज्यभरात रात्रंदिवस या दोन सत्रांत ९३७ रुग्णवाहिका कार्यरत असून त्यातील २३३ रुग्णवाहिकांमध्ये अद्ययावत लाइफ सपोर्ट असून ७०४ रुग्णवाहिकांमध्ये बेसिक लाइफ सपोर्टची सेवा उपलब्ध आहे.अशी चालते यंत्रणारुग्ण किंवा नातेवाईक वा इतरांकडून १०८ क्रमांकावर रुग्णवाहिकेसाठी विचारणा केली असता, तो क्रमांक कुठला ते शोधले जाते. त्याच वेळी जीपीएस प्रणालीने त्या मार्गावर कोणते रुग्णालय आहे, हे पाहून तेथील ग्रामीण, उपरुग्णालय किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधत रुग्णाविषयी कल्पना दिली जाते. तेथील १०८ वरील वाहनचालकांशी संपर्क साधत, अवघ्या १५-२० मिनिटांत रुग्णवाहिका रुग्णांपर्यंत पोहोचते. दरम्यान, त्यानंतर रुग्णावर त्वरित प्राथमिक उपचार सुरू होतात. गरज भासल्यास अपघातग्रस्त वा आपत्कालीन स्थितीत असलेल्या रुग्णाला रुग्णालयातही नेले जाते.