शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक ते बांगलादेशचा प्रवास केवळ ६४ रुपयांमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 23:27 IST

विजय मोरे, नाशिक‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने राज्यांतर्गत प्रवाशांच्या प्रदीर्घ सेवेनंतर या क्षेत्रात आणखी एक पाऊल पुढे टाकत आंतरराष्ट्रीय एसटीसेवेची मुहूर्तमेढ केवळ रोवलीच नाही, तर सुरूदेखील केली आहे़ एसटीच्या या सेवेद्वारे प्रवाशांना नाशिकहून बांगलादेशचा प्रवास केवळ ६४ रुपयांमध्ये करणे शक्य झाले आहे़ विशेष म्हणजे, इतक्या ...

ठळक मुद्देमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळछापील तिकीट व्हायरल नागरिकांमध्ये चर्चेचा विषय

विजय मोरे, नाशिक‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ असे ब्रीदवाक्य असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने राज्यांतर्गत प्रवाशांच्या प्रदीर्घ सेवेनंतर या क्षेत्रात आणखी एक पाऊल पुढे टाकत आंतरराष्ट्रीय एसटीसेवेची मुहूर्तमेढ केवळ रोवलीच नाही, तर सुरूदेखील केली आहे़ एसटीच्या या सेवेद्वारे प्रवाशांना नाशिकहून बांगलादेशचा प्रवास केवळ ६४ रुपयांमध्ये करणे शक्य झाले आहे़ विशेष म्हणजे, इतक्या दूरच्या या प्रवासाचे एकूण टप्पे केवळ दहा असणार आहेत़

एसटी महामंडळाने नव्याने सुरू केलेल्या या सेवेबाबत अनभिज्ञ असलेल्या प्रवाशांना या आंतरराष्ट्रीय प्रवाससेवेबाबत प्रश्नचिन्ह पडणे साहजिकच आहे़ कारण एसटीच्या प्रवाशांना पावसाळ्यात गळणाºया बसेस, खिडक्या एकदा बंद केल्या की उघडणे आणि उघडलेल्या असतील तर बंद करणे अवघड, रस्त्यावरून जाताना होणारा खडखड आवाज याची जणू सवयच झाली आहे़ त्यातच कामगारांचे वेतन करारासाठी आंदोलन सुरू असताना ही सेवा नेमकी कोणी, केव्हा व कधी सुरू केली? विशेष म्हणजे एसटी कात टाकतेय, मनोरंजनासाठी वायफाय सुरू केले आहे याची धूमधडाक्यात प्रसिद्धी करणाºया महामंडळांने या आंतरराष्ट्रीय सेवेचा गाजावाजा का केला नाही, अशी शंका प्रवाशांच्या मनात उपस्थित होणे साहजिकच आहे़एसटी महामंडळाच्या या आंतरराष्ट्रीय सेवेबाबत सविस्तर चर्चेचे कारण असे की, महामंडळाच्या जालना जिल्ह्यातील अंबड आगाराच्या साध्या एसटीमध्ये २२ सप्टेंबर २०१७ रोजी सकाळी ११ वाजून १४ मिनिटांनी येवल्याहून एक प्रवासी बसला़ या प्रवाशाचा तिकीट क्रमांक होता ०१००९९़ बसचे कंडक्टर डी़ डी़ गरड यांनी या प्रवाशास दिलेले तिकीट सध्या सोशल मीडियावरील व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झाले आहे़ या तिकिटावर येवला ते बांगलादेश असे लिहिलेले असून, प्रवासाचे दहा टप्पे आहेत़ मुळात प्रवास भाडे हे केवळ ६३ रुपये असून, अपघात संरक्षण निधीचा एक रुपया त्यामध्ये अधिक झाल्याने हे प्रवासभाडे ६४ रुपये झाले आहे़एसटी महामंडळाचे कर्मचारी हे पुरेशा सुविधांअभावी दिवस-रात्र प्रवाशांना सेवा देत आहेत़ मात्र, सोशल मीडिया व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल झालेल्या या तिकिटामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. अर्थात, हे मूळ तिकीट आहे की यात कोणी खोडसाळपणा करून फेरबदल केलाय हा संशोधनाचा विषय आहे़