शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

उपनगरातील रेल्वेचा प्रवास धोक्याच्या ‘ट्रॅकवर’

By admin | Updated: February 14, 2017 04:49 IST

मुंबई रेल्वेतील ‘उपनगरीय मार्गावरील प्रवास’ हा धोक्याचा बनत चालला आहे. २0१६मध्ये झालेल्या विविध अपघातांत ३ हजार २0२ जणांना प्राण

मुंबई : मुंबई रेल्वेतील ‘उपनगरीय मार्गावरील प्रवास’ हा धोक्याचा बनत चालला आहे. २0१६मध्ये झालेल्या विविध अपघातांत ३ हजार २0२ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. यात ठाणे आणि कल्याण स्थानकांत सर्वाधिक अनुक्रमे १२९ व ११७ जणांचा मृत्यू झाल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली. माहिती अधिकार कार्यकर्ते समीर झवेरी यांनी ही माहिती उघडकीस आणली आहे. त्यानंतर उपनगरातील गोरेगाव, बोरीवली, विरार, मानखुर्द या स्थानकांत व त्यादरम्यान मृत्यूंचे प्रमाण अधिक असल्याचे सांगण्यात आले. रेल्वे रूळ ओलांडताना सर्वांत जास्त अपघात होतात. त्यानंतर ट्रेनमधून पडणे, खांबांना धडकणे, ट्रेन व प्लॅटफॉर्मच्या गॅपमध्ये पडणे, ओव्हरहेड वायरचा शॉक लागणे, रुळांवर आत्महत्या करणे, नैसर्गिक मृत्यू व अन्य अपघात रेल्वे स्थानक व हद्दीत होतात आणि त्यात अनेकांना जीव गमवावा लागताना काही गंभीर जखमीही होतात. २0१६मध्ये अशा प्रकारे झालेल्या विविध अपघातांमध्ये मध्य रेल्वे मेन लाइन, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवरील उपनगरीय मार्गावर झालेल्या अपघातांत मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे अपघात झाले आहेत. मध्य रेल्वेच्या मेन लाइनच्या ठाणे ते कल्याण या पट्ट्यात ४७८ जणांचे मृत्यू झाले असून, यामध्ये ठाण्यात सर्वाधिक १२९ जणांचा मृत्यू आणि ७१ जण जखमी, तसेच कल्याण स्थानकात ११७ जणांचा मृत्यू तर १४७ जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. दिवा स्थानकात तर ७१ जणांनी विविध अपघातांत प्राण गमावले आहेत. (प्रतिनिधी)