शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आता ट्रॅफिक सिग्नलही धावणार!

By admin | Updated: May 9, 2017 01:51 IST

कधीही न थांबणाऱ्या मुंबई शहरात आता ‘ट्रॅफिक सिग्नल’ही धावणार आहेत. शहरात सध्या सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांमुळे

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कधीही न थांबणाऱ्या मुंबई शहरात आता ‘ट्रॅफिक सिग्नल’ही धावणार आहेत. शहरात सध्या सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांमुळे ठिकठिकाणी वाहतूककोंडीची समस्या उद्भवते. ही वाहतूककोंडी सोडवण्यासाठी वाहतूक पोलिसांना १३ फिरत्या ट्रॅफिक सिग्नलची मदत होणार आहे.शहरात सध्या सुरू असलेली मेट्रोची कामे, आयपीएल सामने, विविध जनआंदोलने, यामुळे वाहतूक सुरळीत राखताना, मुंबई वाहतूक पोलिसांची तारांबळ उडते. त्यातच वाहतूक पोलिसांच्या कमतरतेमुळे मुंबईतील वाहतूककोंडी हे एक न सुटणारे कोडे बनू पाहत आहे.मुंबई वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात १३ फिरते ट्रॅफिक सिग्नल दाखल करण्यात आले आहेत. आगामी मान्सूनमध्ये या फिरत्या ट्रॅफिक सिग्नलची परीक्षा आहे. फिरत्या ट्रॅफिक सिग्नलचा प्रयोग २०११ साली चेन्नईत करण्यात आला होता. मुंबई शहरात २ हजार किमी लांबीचे रस्ते मार्ग आहेत. या रस्त्यांवर १२०० कायमस्वरूपी ट्रॅफिक सिग्नल कार्यरत आहेत. शहरात नोंदणीकृत २८ लाख वाहने आहेत. यापैकी १३ लाख दुचाकी आणि आठ लाखांहून जास्त चारचाकी व उर्वरित अन्य वाहने आहेत. वाहनांच्या नोंदणीत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने, आगामी काळात वाहतुकीचा प्रश्न गंभीर होणार असल्याचे दिसून येते. त्यामुळे मुंबईतील वाहतूककोंडीवर फिरते ट्रॅफिक सिग्नल प्रभावी ठरतील, असा विश्वास मुंबईकरांनी व्यक्त केला आहे. तंत्रज्ञानाचा वापर योग्यतंत्रज्ञानाचा वापर करून जटिल समस्यांचे निवारण करता येते. फिरत्या ट्रॅफिक सिग्नलमुळे वाहतूक पोलिसांना वाहतूककोंडी सोडवण्यासाठी निश्चित मदतच होणार असल्याचे पोलीस उपायुक्त संजय जाधव (वाहतूक उपनगर) यांनी सांगितले.